चकलांबा येथे मनोज जरांगे पाटलांची भव्य-दिव्य अशी जाहीर सभा

254

🔸टिपू सुलतान चौकामध्ये मुस्लीम बांधवाकडून भव्य-दिव्य सत्कार

🔸या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे –सकल मराठा समाज बांधव

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.7जानेवारी):-मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे त्या अनुषंगाने गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे दिनांक ८ जानेवारी २०२४ सोमवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता चकलांबा येथे मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार असून यांची चकलांबा बस स्टँड येथे भव्य – दिव्य अशी जाहीर सभा होणार आहे. तरी चकलांबा आणि चकलांबा परिसरातील सर्व मराठा बांधवांनी तसेच लहान मोठे तरुण जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज बांधवाकडून करण्यात आले आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची चकलांबा येथे दिनांक ८जानेवारी २०२४ सकाळी ठीक १० वाजता टिपू सुलतान चौक येथे मुस्लीम बांधवाकडून मनोज जरांगे पाटलांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ,येथुन संत सावता माळी चौकापासुन निघुन बस स्टँड वर जाहीर सभा होणार आहे. या सभेला जास्तीत-जास्त जन समुदाय उपस्थित राहणार आहे अशी माहिती चकलांबा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.