शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा-राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांची राहणार उपस्थिती

129

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7जानेवारी):-शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा मंगळवार,दि.९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर,नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे,विभागीय सरचिटणीस शरद काकडे आदी उपस्थित राहणार आहेत.जुनी सेवा,जुनी पेन्शन,कमी पटाच्या शाळा बंद धोरण,अशैक्षणिक कामे,ऑनलाईन कामे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर या मेळाव्यात विचारमंथन होणार आहे.

शिक्षक भारतीच्या पदाधिका-यांनी व सर्व सदस्यांनी तथा शिक्षक बांधवांनी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश डांगे,जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी,विलास फलके,रावण शेरकुरे,डाकेश्वर कामडी, राजेश घोडमारे,कैलाश बोरकर,विरेनकुमार खोब्रागडे,विजय मिटपल्लीवार,राजाराम घोळके,प्रेम पवार,प्रवीण वानखेडे,राजेश धोंगडे,रवींद्र कोटांगले रॉबिन करमरकर,निर्मला सोनवणे,रंजना तडस,निर्मला उईके,माधुरी डोंगरकर आदींनी केले आहे.