मांडवा येथील शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत

149

🔸मांडवा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप आबाळे तर उपाध्यक्षपदी धम्मदिप ढोले

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.7जानेवारी):-पंचायत समिती पुसद केंद्र सावरगाव (बं) अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मांडवा येथील शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली.

यासाठी पालक व शिक्षकवर्ग यांची विशेष पालक सभा घेण्यात आली होती.व नवनिर्वाचित सदस्यामधून अध्यक्षपदी संदीप आबाळे तर उपाध्यक्षपदी धम्मदीप ढोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका माधुरी पापीनवार यांनी निवड प्रक्रिया व शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य यावर मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अल्का ढोले सरपंच,दत्तराव पुलाते पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक व शिक्षकवर्ग आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये माणिक राठोड, देविदास गजभार,सविता ढोले, वंदना ढोले,जोत्सना ढोले, प्रमोद पुलाते, पुष्पा आबाळे, नागनाथ साखरे, गजानन वानखेडे, शिक्षणप्रेमी विठ्ठल राठोड यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचितानी शाळेच्या प्रवेशद्वारावर कमान लोकसहभागातून करण्याचा संकल्प केला.

यावेळी नवनिर्वाचितांचा ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष बजरंग पुलाते, उपाध्यक्ष समाधान आबाळे, योगेश पुलाते, ओमप्रकाश घुक्से, प्रसिद्धीप्रमुख बजरंग राठोड तसेच इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ ,श्रीफळ ,शाल देऊन सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश नालमवार यांनी केले तर आभार कैलास भरगाडे यांनी मानले.