स्मरता कोरोना काळ: होतो जीव घायाळ!

109

[जागतिक कोव्हिड-१९ची लागण प्रारंभ दिन विशेष]

कोरोनाव्हायरस रोग २०१९- कोविड -१९ हा एक अति संसर्गजन्य रोग आहे. जो गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम-संबंधित कोरोनाव्हायरस २ अथवा एसएआरएस- कोव्ह-२ या नावाच्या नवीन विषाणूद्वारे होतो. ज्या सार्स या रोगाने आग्नेय आशियामधे थैमान घातले होते. त्या कोरोनाव्हायरस विषाणूच्या प्रजातीतील पण पूर्णपणे नवीन असा हा विषाणू आहे. त्यावर प्रतिबंध- प्रवास टाळणे, वारंवार साबणाने व्यवस्थित हात धुणे, इतरांशी शारीरिक अंतर राखणे आदी आहेत. १३,५८,६९,७०४ पेक्षा जास्त लोक संक्रमीत तर २९,३५,२७१ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. कोव्हिड-१९च्या जबड्यातून बालंबाल बचावलेले श्री कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे गुरूजी यांचा हा अनुभवपूर्ण लेख…

डिसेंबर २०१९मध्ये चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये या नवीन आजाराची पहिली ओळख करण्यात आली होती. तेथेच हा रोग कृत्रिमपणे तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर जागतिक स्तरावर या आजाराचा प्रसार झाला व त्याने जागतिक महामारीचे रूप घेतले. तो जगभरात पसरण्यास दि.७ जानेवारी २०२०पासून प्रारंभ झाला. या आजाराच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला आणि श्वास लागणे यांचा समावेश आहे, तर इतर लक्षणांमध्ये थकवा, स्नायू दुखणे, अतिसार, घसा खवखवणे, गंध कमी होणे आणि पोटदुखी या लक्षणांचा समावेश असू शकतो. सामान्यत: लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यापर्यंतचा कालावधी हा दोन ते चौदा दिवसांचा असू शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात, तर काही रोग्यांमधे व्हायरल न्युमोनिया आणि बहु-अवयव निकामी होण्याची भीती असते. १२ एप्रिल २०२१पर्यंत जगातील १८५ देशातील १३,५८,६९,७०४ पेक्षा जास्त लोकांना हा रोग झाला असल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

परिणामी २९,३५,२७१ पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. त्यात माझीही पत्नी दि.६ एप्रिल २०२१ रोजी जगाचा निरोप घेऊन मला सोडून गेली. ७,७२,८४,५६६ पेक्षा जास्त लोक बरेही झाले आहेत. एकूण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी दोन टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. या कोरोना काळात हाहाकार माजला होता. हातावर पोट असणाऱ्यांची पुरती धांदल उडाली होती. म्हणून कोरोनातील परिस्थिती आठवली नव्हे नव्हे, केवळ कोरोना शब्द कानी पडला तरी आपल्याला रडू कोसळते. डोळ्यादेखत प्रियजणांना मरतांना पाहून जीव कळवळत होता, धास्तीने जीव गुदमरत होते. ती परिस्थिती शब्दांत मांडणे अशक्यच!

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेकातील पहिल्या रुग्णाची नोंद दि.९ मार्च २०२० रोजी पुण्यात झाली होती. हा विषाणू प्रामुख्याने जवळच्या संपर्कादरम्यान खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या तुषारांमुळे लोकांमध्ये पसरतो. हे थेंब अथवा तुषार श्वासोच्छवासाच्या दरम्यानदेखील बाहेर पडून आजूबाजूच्या जमिनीवर किंवा पृष्ठभागांवर पडतात व अशा दूषित पृष्ठभागाला हाताने स्पर्श करून आणि नंतर तोच त्यांच्या चेहऱ्याला लावल्यानेही लोक संक्रमित होऊ शकतात. हे विषाणू ७२ तासांपर्यत या दूषित पृष्ठभागांवर जिवंत राहू शकतात. लक्षणे दिसल्यानंतरच्या पहिल्या तीन दिवसांत हा विषाणू सर्वात जास्त संक्रामक असतो, परंतु रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वी देखिल आणि रोगाच्या नंतरच्या टप्प्यात देखील फार संक्रामक असतो.

या रोगाच्या निदानाची मानक पद्धत म्हणजे नाकातून घेतलेल्या नमुन्यांची रीअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन- आरआरटी-पीसीआर नावाची तपासणी होय. वारंवार साबणाने व्यवस्थित हात धुणे, इतरांशी शारीरिक अंतर राखणे, विशेषतः लक्षणे असणाऱ्या लोकांकडून खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे, अचानक शिंक आली असताना व रुमाल जवळ नसल्यास कोपर तोंडावर धरून हाताच्या आतल्या बाजूला शिकणे, न धुतलेले हात चेहऱ्यापासून दूर ठेवणे या व अशा उपायांचा वापर केल्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते. ज्यांना विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे अथवा सौम्य लक्षणे दिसत आहेत, अशांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्या अथवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वानी मास्क वापरण्याची शिफारस केली जाते. सध्या, कोरोनाव्हायरस रोग २०१९- कोविड -१९ वर जगात कोणतीही लस किंवा विशिष्ट उपचार नाहीत.

फक्त रोग्याच्या लक्षणांवर आधारीत उपचार, प्रतिकार शक्ती वाढविण्याचे उपाय, विलगीकरण व काही प्रयोगात्मक उपाय या गोष्टींचा उपचार म्हणून वापर केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोनाव्हायरस रोग २०१९- कोविड-१९चा उद्रेक हा सार्वजनिक आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे सांगत या उद्रेकाला जागतिक महामारी जाहीर केले आहे. टेड्राॅस ॲडमहॅनोम गेब्रेयेसोस यांनी हे नाव घोषित केले. इंटरनॅशनल कमिटी ऑफ टॅक्सोनाॅमी ऑफ व्हायरस यांनी सार्स-कोव्ह-२ हे नाव दिले होते. ढोबळ मानाने कोरोनाचे ४ प्रकार असे- २२९ई अल्फा कोरोनाव्हायरस, एनएल६३ अल्फा कोरोनाव्हायरस, ओसी४३ बीटा कोरोनाव्हायरस, एचकेयू बीटा कोरोनाव्हायरस सांगतात.
कोरोनाव्हायरस रोग २०१९- कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झालेल्यांना ताप, खोकला, थकवा आणि श्वास लागणे अशी फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. श्वास घेण्यात अडचण, सतत छातीत दुखणे किंवा छातीवर दबाव असल्यासारखे वाटणे, गोंधळून जाणे, जागे होण्यास अडचण येणे आणि चेहरा किंवा ओठ निळे होणे या सारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचारांचा सल्ला दिला जातो. शिंका येणे, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे अथावा मळमळ, उलट्या किंवा अतिसार ही लक्षणे फार कमी रुग्णांमधे दिसून आली आहेत.

हा रोग कसा पसरतो? याबद्दलचे काही तपशील निश्चित केले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आणि अमेरीकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेंशन- सीडीसी या संस्थांच्या म्हणण्यानुसार हे विषाणू मुख्यत: दोन व्यक्तींच्या जवळच्या संपर्काच्या वेळी तसेच खोकला, शिंका येणे किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या थेंबाद्वारे पसरतात. जवळचा संपर्क म्हणजे १ मीटर अथवा ३ फूट समजले जाते. सिंगापूरमधील एका संशोधनात असे आढळले आहे, की खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर न केल्यास किंवा मास्कचा वापर न केल्यास कोरोनाव्हायरस रोग २०१९- कोविड-१९ विषाणू हवेतून १५ फुटापर्यंत लांब पसरु शकत्तात. हे विषाणू जवळच्या लोकांच्या तोंडात किंवा नाकात शिरतात आणि श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांमध्ये पोहचतात.

प्रारंभिक अभ्यासानुसार कोरोनाव्हायरस रोग २०१९ विषाणूच्या संक्रमित व्यक्तींची संख्या ही दर ६ ते ७ दिवसांची दुप्पट होते आणि याचे मूलभूत पुनरुत्पादन प्रमाण हे २.२ ते २.७ असल्याचे मानले जात होते, परंतु ७ एप्रिल २०२० रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार वुहानमधील साथीच्या सुरुवातीच्या काळात संक्रमित व्यक्तींची संख्या ही दर २.२ ते ३.३ दिवसांनी दुप्पट झाली होती. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर त्याच हाताने डोळ्यावर, नाकात किंवा तोंडाला स्पर्श करते तेव्हा अशा कृतीने ती व्यक्ती संक्रमित होते. त्यास फोमेट ट्रान्समिशन म्हणून ओळखले जाते. संक्रमित व्यक्तीच्या मलमूत्रातून विषाणूचे संक्रमण पसरते, अशी चिंता व्यक्त केली जात असली तरी हा धोका कमी असल्याचेही मानले जाते.
लक्षणे दिसू लागताना हा विषाणू सर्वात जास्त संक्रामक असतो, परंतु लक्षणे दिसत नसतानाही व ती उद्भवण्याआधीही एखाद्या व्यक्तीद्वारा विषाणू पसरवला जाण्याची शक्यता आहे, परंतु अशी जोखीम कमी असल्याचे मानले जाते.

युरोपीयन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन एंड कंट्रोल- ईसीडीसी या संस्थेच्या म्हणण्यानुसार हा रोग किती सहजतेने पसरतो, हे पूर्णपणे स्पष्ट नसले तरी एक व्यक्ती साधारणपणे दोन ते तीन इतर व्यक्तींना संक्रमित करते. विषाणुशास्त्र- सीव्हियर ॲक्युट रेस्पेरेट्री सिंड्रोम कोरोनाव्हायरस २ हा एक व्हायरसचा वाण आहे, ज्यामुळे कोविड -१९ हा श्वसन रोग होतो. याला बोली भाषेत कोरोनाव्हायरस म्हणून ओळखले जाते. सुरुवातीच्या काळात याला नॉव्हेल कोरोनाव्हायरस- एनसीओव्ही हे तात्पुरते नाव दिले होते. जनुकीय विश्लेषणावरून असे दिसून आले आहे, की कोरोनाव्हायरस हा विषाणू बीटाकोरोनॅव्हायरस या विषाणूंच्या प्रजातीमधील आहे. बीटाकोरोनॅव्हायरस या प्रजातीतील इतर विषाणू म्हणजे सार्स व मार्स होय. दि.१७ जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनाने सार्स-सीओव्ही -२ साठी अनेक आरएनए चाचणीचे मानदंड प्रकाशित केले व रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन- आरआरटी-पीसीआर ही चाचणी कोरोना लागण झाल्याचे पुष्टीकरण करण्यासाठी प्रमाणित केली.

ही चाचणी विशेषतः नाकातून घेतलेल्या नमुन्यांची अथवा घशातून घेतलेल्या थुंकीच्या नमुन्यांवर केली जाते. चिनच्या शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरसच्या नमुन्याच्या विश्लेषणांती या विषाणुचे जनुकीय गुणसुत्र मिळवण्यात यश मिळाले. जगभरातील संशोधकांना स्वतःचे रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन- आरआरटी-पीसीआर या चाचणीचे टेस्ट किट बनवण्यासाठी मदत होइल या उद्देशाने ते संशोधन चिनच्या शास्त्रज्ञांनी जाहीर प्रकाशित केले. दि.७ एप्रिल २०२० रोजी भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने एचएलएल लाइफकेयर लिमिटेड या सरकारी कंपनीने विकसित केलेले रॅपिड अँटिबॉडी ब्लड टेस्ट किटला प्राथमिक चाचणी म्हणून मान्यता दिली. १५ ते २० मिनिटांत होणाऱ्या या चाचणीच्या मदतीने कोरोना प्रादुर्भाव कोणत्या भागात वाढत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या रॅपिड अँटिबॉडी ब्लड टेस्टची अचूकता केवळ ६० ते ७० टक्के आहे, असा चीनमधिल अनुभव आहे. अँटीबॉडी रक्त चाचणीत रुग्ण संक्रमित असल्याचे अढळल्यास त्या रुग्णांची जागतिक आरोग्य संघटनाने प्रमाणित केलेली आरआरटी-पीसीआर चाचणी होत राहील.

यंदा सन २०२४ या नववर्षाच्या आगमनाबरोबरच जगात परत एकदा कोव्हिड-१९ने डोके वर काढले आहे. सर्वांच्या कानठळ्या बसल्या आहेत. भारतातही त्याने धडाकेबाज एन्ट्री केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शुक्रवार दि.५ जानेवारी २०२४ रोजी भारतात कोविड-१९चे ७६१ रुग्ण आढळले. या आकडेवारीनुसार १२ नवीन मृत्यूची प्रकरणे देखील नोंदली गेली आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वाजता मिळालेल्या माहितीनुसार देशभरातील सक्रिय कोविड-१९ प्रकरणे ४,४२३वरून ४,३३४पर्यंत कमी झाली आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या १,२४९, कर्नाटकात १,२४०, महाराष्ट्रात ९१४, तामिळनाडूमध्ये १९०, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये १२८ सक्रिय प्रकरणे आहेत. मृत्युमुखी पडलेल्या १२ जणांपैकी पाच जण केरळमधील होते. कर्नाटकात चार, महाराष्ट्रात दोन आणि उत्तर प्रदेशात एकाचा मृत्यू झाला आहे. ५ डिसेंबरपर्यंत दैनंदिन रुग्णांची संख्या दुहेरी अंकात होती, मात्र थंडी वाढल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोविड-१९च्या नवीन प्रकार जेएन-१चे प्रकरण १२ राज्यांमध्ये ६१९पर्यंत वाढले आहेत. ७६१ न्यू कोरोनाव्हायरस कर्नाटकात जेएन-१चे १९९, केरळमध्ये १४८, महाराष्ट्रात ११०, गोव्यात ४७, गुजरातमध्ये ३६, आंध्र प्रदेशात ३०, तामिळनाडूमध्ये २६, दिल्लीत १५, राजस्थानमध्ये चार, तेलंगणा, ओडिशा आणि हरियाणात दोन प्रत्येकी एक केस आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर ९८.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. वेबसाइटनुसार देशभरात आतापर्यंत २२०.६७ कोटी कोविड-१९ डोस देण्यात आले आहेत. कोरोनाला तोंड देण्यासाठी सर्वांनी सजग पाऊले टाकलेलीच फायद्याची ठरतील, हे सांगणे न लगेच!

✒️संकलन व सुलेखन:- कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे गुरूजी.रामनगर वॉर्ड, गडचिरोली