व्हाईस ऑफ मीडिया गंगाखेड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अन्वर शेख लिंबेकर

156

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7जानेवारी):-व्हाईस ऑफ मीडिया गंगाखेड तालुका पत्रकार संघाची बैठक दि. 6 जानेवारी शनिवार रोजी येथील शासकीय विश्राम गृहात संपन्न झाली. या बैठकीत तालुकाध्यक्षपदी अन्वर शेख लिंबेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

शासकीय विश्रामगृह येथे दि. 6 जानेवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली गंगाखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत व्हाईस ऑफ मीडिया गंगाखेड तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अन्वर शेख लिंबेकर, कार्याध्यक्षपदी संजय सुपेकर, सचिव पदी गुणवंत कांबळे, उपाध्यक्ष पदी अली चाऊस यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण मेहता, मो. जावेद इनामदार, तुकाराम आय्या, महालिंग भिसे, शंकर इंगळे, प्रा. गोविंद चोरघडे, राजेश कांबळे, उद्धव चाटे, भीमराव कांबळे, भागवत जलाले, शिवाजी कांबळे, राहुल साबणे, ज्ञानोबा कदम, राजकुमार मुंडे, मोहसीन खान, रामकृष्ण बचाटे, शेख महेमूद, अनिल साळवे, प्रदीप गौरशेटे, बाळासाहेब जंगले, गोपाळ मंत्री, राम पवार, तुषार उपाध्याय आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.