अखील भारतीय युवा आदिवासी विकास परीषदेच्या चिमूर तालुकाध्यक्षपदी ओंकार कोवे यांची नियुक्ती

61

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.8जानेवारी):-आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सन १९६८ ला संस्थापक अध्यक्ष स्व.कार्तिक उरांव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद नवी दिल्ली च्या आदेशान्वये महाराष्ट प्रदेश महासचिव केशव तिराणीक , चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जनार्दन गेडाम व युवा जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ५ जानेवारी २०२४ रोजी अखिल भारतीय विदयार्थी परीषद चिमूर तालुकाध्यक्षपदी ओंकार कोवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदिवासी समाजातील तळागाळातील लोकांच्या विविध समस्या समजून घेवून त्या मार्गी लावण्यासाठी तसेच तरूण पिढीला समाजात कार्य करण्याची संधी देण्यासाठी अखिल भारतीय युवा आदिवासी विकास परीषदेची निर्मिती करण्यात आली आहे.

युवा तालुकाध्यक्ष ओंकार कोवे यांच्या निवडीबद्धल युवाशक्तीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून समाजातील लोकांना न्याय मिळवून दयायला युद्धपातळीवर कार्यरत राहीन असा आशावाद अखील भारतीय युवा आदिवासी विकास परीषदेचे नवनियुक्त चिमूरचे युवा तालुकाध्यक्ष ओंकार कोवे यांनी व्यक्त केला आहे.