शिवशंकर घरडे नवोपक्रमशिल शिक्षक तथा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

133

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.8जानेवारी):- अग्निपंख शैक्षणिक समूह,महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिवशंकर घरडे यांना राज्यस्तरीय नवोपक्रमशिल शिक्षक तथा आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कारासाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून शेकडो प्रस्ताव (नवोपक्रमासह) अग्निपंख शैक्षणिक समुहाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी फक्त 52 शिक्षकांची सदर पुरस्कासाठी निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या नवोपक्रमशिल/आदर्श शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी,देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवी रेणुकामाता मंदिर व श्री दत्त मंदिर या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या बालाजी मंगलम माहूरगड ता.माहूर जि. नांदेड येथे मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला.

त्यात पुसद येथील युवक मंडळ द्वारा संचालित, वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील गणित शिक्षक तथा पर्यवेक्षक शिवशंकर घरडे यांना मानाचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू म्हणून पंख भरारीचे हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

या गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष मा.प्रमोद सूर्यवंशी ( माजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.यवतमाळ), विशेष अतिथी म्हणून मा.डॉ. प्रशांत गावंडे (प्राचार्य डायट , यवतमाळ), मा. राजु मुधोळकर (गटशिक्षणाधिकारी, पं.स. माहुर), मा.धम्मरत्न वायवळ (अधिव्याख्याता डायट, यवतमाळ), मा.मंजुषा ढाकरे सामाजिक कार्यकर्त्या छत्रपती संभाजी नगर, मा.माया मुळे प्राध्यापक पुणे, मा.ज्योती पिंपरखेडे , मा.अर्चना मेहरे महिला राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य, मा.गजानन गोपेवाड राज्य संघटक, अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते.

सदर पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल शिवशंकर घरडे यांचे , युवक मंडळ,पुसदचे सचिव मा. विजयभाऊ जाधव तथा समस्त संचालक मंडळ, समस्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद,मित्रपरिवार यांनी अभिनंदन तथा कौतुक केले आहे.यापूर्वी देखील त्यांना शिक्षक गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षणरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय गुणिजन गौरव शिक्षकरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले होते हे विशेष.