साताऱ्यातील तारळी प्रकाशनाच्या नकाशाने विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली- लक्ष्मण उबाळे

188

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.9जानेवारी):-सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती घडली आहे . आता जागतिक पातळीवरील घडामोडीची माहिती नकाशाद्वारे विद्यार्थ्यांना व्हावी. ही आता काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे तारळी प्रकाशनच्या वतीने निर्माण केलेले नकाशे तयार करण्याची कला हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे. असे प्रतिपादन बाल विज्ञान प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे यांनी केले आहे.

सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या भव्यदिव्य महोत्सवात या वेळेला या तारळी प्रकाशन स्टॉलचे उद्घाघाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी ,प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, प्राचार्य यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी ,माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, साहित्य प्रदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेला ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, खुडे व शिंदे उपस्थित होते.

नकाशा काढायला शिकवणारी भारतातील एकमेव पुस्तक मालिका असून या पुस्तकांमध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्र तसेच भारत देशाचा नकाशाची माहिती देण्यात आलेली आहे. या पुस्तकासाठी डॉ. विजय पगारे, डॅनियल खुडे, राजेंद्र गलांडे यांचे सहकार्य लाभले आहे. सातारा जिल्ह्याची ओळख, किल्ले, ऐतिहासिक वास्तू, पीक पाणी, लोकसंख्या तसेच देश व महाराष्ट्रातील माहिती सुद्धा या पुस्तकांमध्ये असून संपूर्ण पुस्तके जिल्हा, राज्य आणि देशाची माहिती अधोरेखित करणारे आहेत.

हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल असा विश्वास या वेळेला महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली असून दुसऱ्या आवृत्तीच्या दृष्टीने मार्गक्रमण होत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तके पन्नास रुपये किमतीचे असून त्यातून बौद्धिक चालना मिळत आहे. गुरुजनांना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने जिल्हा, राज्य व देशाची माहिती या नकाशाच्या आधारे देण्यास सोपी जात आहे. एवढेच नव्हे तर नकाशा कशा पद्धतीने ? काढल्यानंतर तो लक्षात राहतो. अशा दृष्टीने त्याची मांडणी ज्येष्ठ विचारवंत साहित्य व पत्रकार शिवाजी काळभोर यांनी सोप्या शब्दात समजून सांगितले आहे.

या तारळी प्रकाशन पुस्तक स्टॉलला सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, ज्येष्ठ पत्रकार व वक्ते हरीश पाटणे, साहित्य मधुसूदन पत्की, विजय मांडके, उमेश भामरे, संदीप राक्षे आर डी भोसले, विनीत जवळकर, प्रतीक भद्रे, भारत जगताप यांच्यासह मान्यवरांनी पुस्तक खरेदी करून या संकल्पनेचे कौतुक केले आहे.