संत जगनाडे महाराज त्या काळात एक धगधगता सुर्य– रामअप्पा दावलबाजे

125

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9जानेवारी):-त्या काळात सर्वत्र समाजात अशांततेच वातावरण पसरल होत.अडाणी समाज विनाकारण अंधश्रद्धेला बळी पडू लागला, समाजातील प्रख्यात पंडित, समाजाच दाईत्व करणारे त्यां काळचे समाज कार्यकर्ते गोरगरीबांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करायचे आणि ते म्हणतील तोच कायदा आणि ते म्हणतील तीच सुव्यवस्था, दुसर्याच वर्चस्व त्यांना सहन होत नसायचे.असे वक्तव्य रामअप्पा दावलबाजे यांनी श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात केले.

येथील पलसिध्द मठात श्री संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून गुलालाची उधळन करण्यात आली या वेळी गोपाळ काञे राजेश्वर गौरकर रामअप्पा दावलबाजे संजय गौरकरकर बाळासाहेब गौरकर सखाराम चौधरी वसंत कौले बालाजी गव्हाणकर सुरज गौरकर शुभंम भिसे अतुल दावलबाजे समीर हट्टेकर अमोल फुलारी महेश गौरकर सह समाज बांधव उपस्थित होते पूढे बोलताना रामअप्पा दावलबाजे म्हणाले की त्याच काळात एक धगधगता सुरू या समाजात वावरत होता. त्या धगधगत्या सुर्याला या अडाणी समाजाची आणि त्यांच्यावर आलेल्या कठीण परिस्थितीच्या ज्वाळा सहन होत नव्हत्या, उघड्या डोळ्यांनी पाहवत नव्हत्या तोच धगधगता सुर्य म्हणजे संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज.

त्यावेळी तुकाराम महाराजांचे ठिकठिकाणी कीर्तन व्हायचे.संताजी महाराज हे तुकाराम महाराज समकालीन संत होते. त्यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांची किर्ती सर्वत्र पसरली होती.अशातच एक दिवस तुकाराम महाराज संताजी जगनाडे महाराज यांच्या सुदुंबरे या गावी कीर्तनाला गेले असता या कीर्तनाला संताजी जगनाडे महाराज आले होते आणि त्यांनी तुकाराम महाराजांचे संपूर्ण कीर्तन अगदी जीव लावून ऐकले आणि त्यांच्या ते मनातच बसले.तुकोबारायांच हे कीर्तन ऐकून संताजीवर मोठा प्रभाव पडला त्यांनी संसाराचा त्याग करण्याचे ठरवले पण त्यावेळी श्री तुकाराम महाराज यांनी संताजींना सांगितले की संसारात राहूनही परमार्थ करता येतो. त्यासाठी संसार सोडण्याची काहीच आवश्यकता नाही संताजी जगनाडे महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचे टाळकरी म्हणून सामिल झाले तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकर्या पैकी ते एक होते.