अहमदनगर – अहमदपूर राज्य महामार्गावरील ४ लेन पैकी एकच खुली, टोलनाक्यावर वाहतुकीस अडथळा कंत्राटदारांचा मनमानी कारभार – डॉ.गणेश ढवळे

130

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

गेवराई(दि.9जानेवारी):-अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते चुंभळीफाटा ३३ किलोमीटर लांबीच्या किंमत १६६ कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मधुकान -श्रीहरी- हुले कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आले असुन पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही याठिकाणी मागील काही दिवसांपासून टोलनाका सुरू झाला असुन वर्दळीचा मार्ग असल्याने लहान मोठ्या वाहनांची दिवस रात्र धावताना दिसतात.येथील टोलनाक्यावरील एका बाजुच्या ३ लेन पैकी केवळ १ लेन सुरू असुन ईतर लेन बंद असतात.

केवळ एकच लेन वाहतुकीसाठी खुली असल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात.वाहन धारकांना पैसे मोजून नाहक वेळ खर्च करावा लागत आहे.बंद लेन विषयी विचारणा केल्यावर वाहनधारक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होतात.भरमसाठ टोल वसुली करून योग्य सुविधा मिळत नसतील तर मग टोल भरायचा तरी कशासाठी असा संतप्त सवाल वाहनधारक करत आहेत.

तसेच टोल नाक्यावरील रबरी गतिरोधके तुटलेली असुन लोखंडी खिळे उघडे पडल्याने वाहनांचे टायर फुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.याकडे कंत्राटदार, कर्मचारी यांचे दुर्लक्ष असुन तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या) मुंबई,अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गतिरोधक तुटुन लोखंडी खिळे वर तर बरीकेट्स,ड्रमचा दुचाकी वाहनांना अडथळा,अपघाताची दाट शक्यता
—-
दुचाकी वाहनांसाठी साठी जो खुला मार्ग सोडायला हवा त्याठिकाणी ड्रम व बरीकेट्स ऊभी केली जात आहेत त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कार्यरत कर्मचारी वाहनचालकांना उद्धट वागणूक देतात यामुळे वाद निर्माण होत आहेत.तसेच टोलनाक्यावरील गतिरोधक दुरावस्थेत असुन तुटल्याने खिळे उघडे पडले आहेत. वाहनांचे टायर फुटुन अपघाताची दाट शक्यता आहे.मात्र याकडे कंत्राटदार आणि कार्यरत कर्मचारी यांचे दुर्लक्ष आहे.त्यामुळे त्याठिकाणी तातडीने खिळे उघडे पडलेल्या गतिरोधकांची दुरुस्ती करण्यात यावी.