खंडित वीजपुरवठ्यामुळे खरात वस्तीवरील नागरिक हैराण; वीजपुरवठा सुरळीत करण्याची महिला अधिकार परिषदेची मागणी!

232

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.12जानेवारी):-पांढरवाडी ता. माण येथील खरात वस्तीवर सतत खंडित होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून वीजपुरवठा नियमित करावा अशा मागणीचे निवेदन महिला अधिकार परिषदेच्या वतीने शाखा अभियंता कदम साहेब यांना देणेत आले
निवेदनात म्हटले आहे की खरात वस्ती येथे 20 ते 25 कुटुंब असून सगळ्यांनी घरामध्ये वीज कनेक्शन घेतले आहे व नियमित वीज बिल भरत आहेत असे असताना वस्तीवरील वीज पुरवठा सतत खंडित होत आहे.

कधी कधी तर दोन दोन दिवस वीज जाते.अंधारामुळे अनेकवेळा विंचू ,साप चावण्याचे प्रकार घडले आहेत परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण पुढे होणार नाही याची हमी देता येत नाही त्यामुळे वीजपुरवठा नियमित करावा,सिंगल फेज चे कनेक्शन द्यावे व अंधारामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर महिला अधिकार परिषदेच्या अध्यक्षा भारती पवार,कल्पना खरात ,पुष्पा भुजबळ,राणी अवघडे,वंदना कुंभार,वैशाली चव्हाण,सारिका गायकवाड,छाया पांढरे,मनीषा जाधव,सुषमा खरात,मालन खरात,नंदा खरात कलावती खरात यांच्या सह्या आहेत.शाखा अभियंता कदम साहेब यांनी तांत्रिक अडचण दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महिलांना दिले