जिजाऊ नागरी सहकारी पत संस्था चिमूर येथे माँ जिजाऊ जयंती साजरी

84

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.12जानेवारी):-येथील जिजाऊ नागरी सह.पत संस्था येथे राजमाता माँ जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील संस्थेत राजमाता माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेच कर्ज समिती अध्यक्ष डॉ. संजय पिठाडे व डॉ.पोर्णिमा खानेकर यांचे हस्ते पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

तसेच त्यांनी माँ जिजाऊ यांच्या जीवन कार्याचा गौरवोद्गार सांगितले यावेळी संस्था अध्यक्ष सुभाष शेषकर,सचिव रामभाऊ खडसिंगे, संचालीका मंगला वेदी, सपना गंपावार, व्यवस्थापक मिलींद जांभुळे, लिपिक शुभम भुडे, रुपाली राणे, कोकिळा दुधनकर, लक्ष्मी चौधरी, लीना कोरामे तसेच डॉ, महेश खानेकर,भावना पाहुणे, विठ्ठल इंगळे अनेकांची उपस्थिती होती.