अन्याय अत्याचार भ्रष्टाचारविरोधात आवाज उडवणारे निर्भीड पत्रकार नवनाथ आडे यांचे व्हाट्सअप बॅन

211

✒️बीड(पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क)

बीड(दि.13जानेवारी):-माणसाची एक सहज प्रवृत्ती आहे की मानवाला कोणाची प्रगती सहन होत नाही. आणि इतर व्यक्ती सत्कर्म करत असेल किंवा आपल्या हिमतीच्या जोरावर प्रसिद्धीस येत असेल तेही लोकांना चांगले दिसत नाही.

असाच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडला आहे. सविस्तर बातमी अशी की गेवराई तालुक्यातील निर्भीड पत्रकार म्हणून सर्वत्र परिचित असणारे नवनाथ आडे आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करीत असतात. आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतात आणि याच त्यांच्या निर्भिडपणामुळे काही जणांच्या नजरेत ते दोषी ठरले आहेत. त्यांचे दिवसेंदिवस पत्रकारिता क्षेत्रात होणारी प्रगती आणि लोकांकडून मिळत असलेली अभिमानाची थाप हे काही समाजकंटकाच्या मनात खोलवर रुजत आहे. आणि याच बदल्याच्या भावनेने नवनाथ आडे यांचे व्हाट्सअप बॅन केले आहे.

व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून केले नाही तरीसुद्धा आपले व्हाट्सअप कसे काय हॅक झाले? मी माझे व्हाट्सअप अगदी जबाबदारीपूर्वक हाताळले तरीही अशी कोणती आक्षेपार्ह पोस्ट माझ्याकडून झाली ज्यामुळे माझे व्हाट्सअप हॅक केले गेले ? असा प्रश्न व्हाट्सअप टीमला नवनाथ आडे यांनी केला आहे. तसेच ९४०४२२३१०० हा व्हाट्सअप नंबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव करून आपल्या जवळील व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे