५७व्या दहा दिवशीय धम्मप्रशिक्षण शिबिराचा समारोप

155

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13जानेवारी):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा व तालुका शाखा पुसद यांच्या अंतर्गत मैत्रेय बुध्दविहार लुबिनीवन परिसर कवडीपुर येथे ५७ व्या दहा दिवशीय उपासक-उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराचा राजमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अरुण पाईकराव अध्यक्ष मैत्रेय बुध्दविहार समिती,प्रमुख अतिथी रविजी भगत जिल्हा अध्यक्ष, मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका लता म्हैसकर,तर प्रमुख पाहुणे तालुकाध्यक्ष भारत कांबळे, प्रल्हाद खडसे, तुकाराम चौरे, एल.पी.कांबळे, भोजराज कांबळे, पत्रकार रामदास कांबळे, प्रा.ढोले सर तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोलेनाथ कांबळे यांनी केले.यावेळी विजया शेंडे, मिना कांबळे, अश्विनी सुर्यतळ,निशा श्रावणे, छाया मनवर,जया काळे, या शिबिरार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. रवि भगत यांनी सांगितले की या दहा दिवसीय उपासक-उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरामुळे धम्माचा प्रचार व प्रसार तसेच अंधश्रद्धा मुक्त समाज निर्माण करणे.तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया मनवर यांनी केले. तर आभार अश्विनी पाईकराव यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.