दापोरी येथे संत्रा ग्रेडिंग, व्हॅक्सिन पॅकिंग प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन संपन्न !

88

🔸शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेला जिल्ह्यातील पहिला प्रकल्प !

✒️रूपेश वाळके(दापोरी प्रतिनिधी)

दापोरी(दि.13जानेवारी):-आयसीआयसीआय फाऊंडेशन च्या सहाय्याने दापोरी येथे शेतकरी गटा अंतर्गत संत्रा प्रतवारी व व्याक्सिंग प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
आयसीआयसीआय फाऊंडेशन च्या ग्रामीण उपजिविका उपक्रमा अंतर्गत ग्रामीण उपजीविका उंचावण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी,चांदुर बाजार,अचलपूर या तीन तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या आर्थिक सहकार्य व तांत्रिक मार्गदर्शनाने या प्रकल्पातील मोर्शी तालुक्यातील दापोरी या प्रकल्प गावामधील दादाजी धूनिवाले शेतकरी गटा अंतर्गत संत्रा प्रतवारी व वॅक्सिंग प्रक्रिया केंद्र हे परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्याकरिता सदर केंद्राची औपचारिक सुरूवात करण्यात आली आहे.

मोर्शी तालुक्यातील दर्जेदार संत्रा उत्पादनासोबतच संत्र्याचे ग्रेडिंग, व्हॅक्सिन आणि पॅकिंग युनिटची उभारणी करून संत्रा उत्पादकांना जादा दर मिळवून देण्यासाठी दापोरी (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथील शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारीत संत्र्याचे क्लिनिंग, वॅक्सिंग व ग्रेडिंग करणारे अत्याधुनिक युनिट उभारले आहे. प्रति तास सहा टन संत्र्यावर या अनुषंगाने प्रक्रिया होणार असून तालुक्यातील संत्रा उत्पादनासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्य संत्रावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन व लोकार्पण गुरुवार दि ११ जानेवारी २०२४ रोजी आयसीआयसीआय फाउंडेशन चे झोनल हेड दीपक पाटील सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

दापोरी येथील संत्रा प्रक्रिया केंद्राच्या सुविधेमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्र्याला स्थानिक तसेच बाहिरील मार्केट मध्ये स्पर्धा करता येईल व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल ज्याचा शेतकऱ्याचा आर्थिक स्तर वाढण्यास मदत होईल असे आयसीआयसीआय फाऊंडेशनचे झोनल हेड दीपक पाटील यांनी केले.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये सरपंच संगीता ठाकरे, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके, सचिन उमाळे, शालिनी अंधारे, वर्षा फलके, मंगला गोळे, नीलेश अंधारे तसेच दादाजी धूनिवाले शेतकरी बचत गट व संत्रा उत्पादक शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सदर कार्यक्रमासोबतच गावकऱ्यांसोबत आयसीआयसीआय फाऊंडेशन मार्फत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता नांदुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपेश अंधारे यांनी केले.