सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट तर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

84

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13जानेवारी):-छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडविण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केलेत,अशा राजमाता जिजाऊ यांच्या 426 व्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या जटपुरा गेट चंद्रपूर येथील कार्यालयात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले .

सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे आणि बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी स्वतंत्र मजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष आणि महावितरणचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता अशोक मस्के, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता लटारी घागी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता सुर्यभान झाडे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर शहर सचिव प्रा‌.भाऊराव मानकर, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे वरिष्ठ संघटक भास्कर सपाट, महावितरण कंपनीचे गुलाब जिवतोडे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केले.