महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण समारोह उत्साहात संपन्न !….

79

🔸ट्रॉफी व मेडल मिळाल्याने विद्यार्थ्यांना अत्यानंद झाला – जे एस पवार ( मुख्या )

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.13जानेवारी):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जन्मोत्सवानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण समारोह आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून खरेदी माध्यमिक शाळेचे उपशिक्षक सी एम भोळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

३ जानेवारी सावित्रीमाई फुले जन्मोत्सवानिमित्त ३ दिवस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते या स्पर्धांमध्ये विजयी संघाना व वैयक्तिक स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी सी.एम.भोळे शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद यांच्या शुभहस्ते ट्रॉफी – मेडल देण्यात आले.

बक्षिस स्वीकारत असतांना विद्यार्थ्यांच्या मनावर अत्यानंद दिसत होता. सर्व विजयी स्पर्धकांना ट्रॉफी- मेडल मिळाल्याने एक नवीन ऊर्जा त्यांच्यामध्ये संचारलेली होती. याप्रसंगी क्रीडा शिक्षक एच डी माळी, एस एन कोळी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. पी डी पाटील यांनी विजयी स्पर्धकांचे व संघाचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी ट्रॉफी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे हावभावाचे निरीक्षण केले तर त्यांच्या चेहऱ्यावर मनस्वी आनंद दिसला हा आनंद विकत घेता येत नाही असे प्रतिपादन पवार यांनी केले. खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच डी माळी, एस एन कोळी यांनी तर आभार एस व्ही आढावे यांनी मानले.