मा.देविदासराव किटे एक आदर्श व्यक्तिमत्त्व – प्रा.अरुण बुंदेले

228

🔸कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे अमृतमहोत्सवानिमित्त मा.देविदासराव किटे यांचा सत्कार

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.14जानेवारी):-“समाजकार्यकर्ते व मार्गदर्शक सत्कारपूर्ती मा.श्री देविदासराव किटे सोज्वळ,निर्मळ व ऋजू स्वभावाचे असून एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. मा.देविदासराव किटेंसारखी ज्येष्ठ मंडळी सामाजिक बांधिलकी स्वीकारून स्वकुटुंबाचे व समाजाचे मार्गदर्शन करीत असतात म्हणून कुटुंबातील व समाजातील वडिलधारी ज्येष्ठ सदस्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा सन्मान त्यांच्या पाल्यांनी आणि समाजाने केला पाहिजे.येथे मा.देविदासराव किटे यांचे सुपुत्र श्री प्रवीणभाऊ किटे, श्री रविभाऊ किटे आणि सुपुत्री सौ.गायत्री राजेंद्र मोहोकर यांनी घडवून आणलेला वडिलांचा हा छानदार अमृतमहोत्सवी सोहळा हा आजच्या आई-वडिलांकडे लक्ष न देणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.”

असे विचार कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी नुकताच माऊली पॉईंट हॉल,अमरावती येथे संपन्न झालेल्या सामाजिक कार्यकर्ते व मार्गदर्शक सत्कारमूर्ती मा.श्री देविदासराव किटे यांच्या
अमृतमहोत्सवानिमित्त विचार व्यक्त केले.

कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे सामाजिक कार्यकर्ते व मार्गदर्शक सत्कारमूर्ती मा.श्री देविदासराव किटे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त
शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले,सचिव सौ.ज्योतीताई बुंदेले व सदस्य श्री गणेशराव बाबारावजी बुंदेले,सौ.कुसुमताई गणेशराव बुंदेले,श्री प्रवीणराव देविदासराव किटे,सौ.रुपालीताई प्रवीणराव किटे,श्री मनोजराव रामभाऊ नासणे,सौ.अंजूताई (दीपालीताई) मनोजराव नासणे, श्री रविभाऊ देविदासराव किटे, सौ.अश्विनी रविभाऊ किटे, सौ.गायत्रीताई राजेंद्रजी मोहोकर यांनी भावपूर्ण सत्कार केला.तसेच सत्काराप्रसंगी चि.शिव मनोजराव नासणे,चि.साई मनोजराव नासणे,कु.रिया प्रवीणराव किटे, कु.परी रविभाऊ किटे उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष श्री निलेश जामठे यांनी महासंघातर्फे तसेच विविध संघटनेतर्फे सत्कारमूर्ती मा.देविदासराव किटे यांचा भावपूर्ण सत्कार केला.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय गव्हाळे,वासुदेवराव वानखडे,समाजभूषण सुधाकरराव विरुळकर यांनी शब्दरूपी अभिष्टचिंतन केले.या अमृत सोहळ्यामध्ये अशोक विजयकर, प्रा.पुंडलिक भामोदे,डॉ.सौ.निर्मला भामोदे, गजानन चंदन,पांडुरंग खंडारे, जगदेव रेवसकर,विजय शेकोकर, डॉ.राजेंद्र चिम,विठ्ठल पखाले, अमोल काकडे,पुंडलिक पखाले, समाधान धाकणे,मनोहर इंगळे, अनिल भागवतकर,शालिनी रामटेके,किरण मेश्राम,अमन रामटेके,वंदना पखाले,संगीता खानोलकर,गीता धाकने,कांचन पखाले,गणेश भागवतकर, प्रेमानंद मेश्राम,शंकर मोहेकर, राजेंद्र मोहेकर,अशोक ढाकरे, विक्की ठोसरे,सतीष पखाले, रुचिता मोहेकर,किशोर इंगळे, अशोक ठाकरे उपस्थित होते.