राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा संपन्न

139

✒️ढाणकी-यवतमाळ(प्रतिनिधी -राजेश घुगरे)मो:-8888569259

ढाणकी(दि.14जानेवारी):-सावळेश्वर येथे दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सोहळा सम्यक संबुद्ध बहुउद्देशीय विकास संस्था यांच्याद्वारे आयोजन करून साजरा करण्यात आला. या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संविधान देऊन बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार केदार साहेब यांच्या हस्ते व सम्यक संबुद्ध बहुउद्देशीय विकास संस्था चे पदाधिकारी यांनी गुणगौरव केला आहे.

तसेच रक्तगट तपासणी आरोग्य निदान उपचार महिला बचत गटांना मार्गदर्शन. ‘मी सावित्री बोलते..’ नाटिका सौ. वंदना संभाजी वाघमारे व अंजली कांबळे यांनी सादर केली व “मी जिजाऊ बोलते…” ही एक पात्री नाटिका कु. अक्षरा शिवाजी काळबांडे यांनी सादर केली. त्यामुळे राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाट्यकेच्या माध्यमातून चांगलाच प्रकाश टाकला आहे. इत्यादी अनेक कार्यक्रमाचे जयंतीच्या निमित्ताने उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य शिक्षण महर्षी डॉ.मोहनराव मोरे सर होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा पाटील अष्टीकर, (भाजप तालुका अध्यक्ष) सुदर्शन पाटील रावते, (गावच्या सरपंच) सौ .अर्चना ओम रावते, (उपसरपंच) अंकुश काळबांडे, (पोलीस पाटील) अनिल कांबळे,(तंटामुक्ती अध्यक्ष) शिवाजी काळबांडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू काळबांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन चिमणाजी बापू काळबांडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी निवृत्ती काळबांडे, संभाजी हापसे, मुकिंदा काळबांडे, रवी पाटील, कासुबाई कांबळे,प्रल्हाद काळबांडे, सिद्धार्थ काळबांडे, हर्षल काळबांडे व सम्यक संबुद्ध बहुउद्देशीय संस्था यांनी अथांग परिश्रम घेतले.