बाबासाहेबांना अभिवादन करून मराठवाडा नामविस्तार दिन साजरा…

110

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.9823995466

उमरखेड (दि.14 जानेवारी)नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील ‘मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही ‘सरकारी मागणी’ या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला.

या ऐतिहासिक नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार आपण करून तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून नामविस्तार दिन आनंदात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन रमामाता महिला मंडळ यांनी केले होते.

यावेळी भदंत कीर्ती बोधी, उषाताई इंगोले अध्यक्ष रमामाता महिला मंडळ, हिराबाई दिवेकर माजी नगरसेविका, भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर सामाजिक कार्यकर्ते, शंकरराव दिवेकर, तुषार पाईकराव, संतोष इंगोले, दिलीप मुनेश्वर,सुधाकर श्रवले, मनोज इंगोले, जिजाबाई दिवेकर, भारतीताई केंद्रेकर, भारताबाई दिवेकर,जानकाबाई इंगोले, यशोधरा धबाले, प्रज्ञाताई दिवेकर, सुनिता दिवेकर, बेबाबाई गवंदे, विद्या इंगोले, उज्वला धबाले, नंदा दिवेकर, राखी धबाले, ममता श्रवले इत्यादी अनेक महिला मोठ्या प्रमाणावर व तरुण मंडळी तसेच लहान बालक बालिका उपस्थित होत्या.