” सत्यशोधक चित्रपट प्रत्येकाने बघितला पाहिजे” -प्रा.अरुण बुंदेले

214

🔸सत्यशोधक चित्रपटाला राष्ट्रपतींनी पुरस्कृत करावे – समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड

🔸राजलक्ष्मी टॉकीज मध्ये सत्यशोधक चित्रपटातील सिनेस्टार कलाकारांचा सत्कार

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.16जानेवारी):-क्रांतियूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांतिकार्यावर प्रकाश टाकणारा ” सत्यशोधक ” हा चित्रपट दि.५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या सत्यशोधक चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक मा.निलेश रावसाहेब जळमकर,लहुजी वस्तादची भूमिका साकारणारे सिनेस्टार श्री सुरेश विश्वकर्मा ( सैराट मध्ये आर्चीच्या वडिलांची भूमिका साकार करणारे ) चित्रपटाचे निर्माते मा.राहूल तायडे व मा. राहूल वानखडे, या चित्रपटाच्या टायटल सॉंगचे गीतकार कवी प्रा.डॉ.चंदू पाखरे (मराठी विभाग प्रमुख,महात्मा फुले महाविद्यालय,वरुड ),चित्रपटाचे संगीतकार मा.राहूल तायडे,अमरावती तसेच इतर कलाकारांचा दि.14 जानेवारी 2024 ला संध्याकाळी सहा ते नऊ च्या शो मध्ये उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड आणि कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व प्रा.श्रीकृष्ण बनसोड लिखित ” विद्रोही महात्मा ” व प्रा.अरुण बुंदेले लिखित ” निखारा ” व ” अभंगतरंग ” ही पुस्तके भेट देऊन सन्मानित केले.

” सत्यशोधक चित्रपटाला राष्ट्रपतींनी पुरस्कृत करावे.”
– प्रा.श्रीकृष्ण बनसोड
याप्रसंगी समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी ,” फुले दाम्पत्यामुळेच आदिवासी समाजातील महिला शिकून राष्ट्रपती ह्या सर्वोच्च पदापर्यंत विराजमान होऊ शकल्या त्यांनी सत्यशोधक चित्रपटला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करावे .”अशी मागणी केली.

” सत्यशोधक चित्रपट प्रत्येकाने बघितला पाहिजे.”
– प्रा.अरुण बुंदेले

परिवर्तनवादी साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी ,” वंचितांना – शोषितांना सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी रूढी,परंपरा व कर्मकांड मुक्त सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी करून जे समाजामध्ये क्रांतिकारी परिवर्तन केले त्याचे वास्तववादी चित्रण विदर्भातील चित्रपट दिग्दर्शक मा.निलेश रावसाहेब जळमकर यांनी दमदारपणे ” सत्यशोधक ” या चित्रपटात केले आहे.त्यांचे व सर्व कलाकारांचे मनस्वी अभिनंदन.सत्यशोधक फुले दांपत्य भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झाले पाहिजे.हा चित्रपट प्रत्येकाने बघितला पाहिजे.”असे विचार व्यक्त केले.

सिनेस्टार मा.सुरेश विश्वकर्मा व लेखक- दिग्दर्शक मा.निलेश जळमकर यांनी मानले प्रेक्षकांचे आभार .

लेखक -दिग्दर्शक मा.निलेश रावसाहेब जळमकर आणि सिनेस्टार मा.सुरेश विश्वकर्मा यांनी मनोगत व्यक्त करताना या “सत्यशोधक” चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांचा जो भरपूर प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. मा.सुरेश विश्वकर्मा यांनी या चित्रपटातील लहुजी वस्ताद यांची भूमिका साकार करताना काही संवाद जेव्हा सिनेमागृहामध्ये ऐकविले तेव्हा संपूर्ण टॉकीज मध्ये टाळ्यांचा वर्षाव झाला.

याप्रसंगी वाद्यवृंदाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने सत्यशोधक चित्रपटातील सिनेस्टार कलाकारांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी प्रा.कमलाकर पायस,डॉ.रजिया सुलताना मा.प्रशांत गवई,राजलक्ष्मी टॉकीजचे मॅनेजर श्री घनश्यामजी यादव,सहव्यवस्थापक श्री सुनिल पांडे, श्री गोपलभाऊ ठाकूर, नंदकिशोर वाठ,प्रा.प्रफुल्ल गवई,इंजि.भारतराव खासबागे, पोलीस पाटील कविता नरेंद्र पाचघरे, श्री सुधीर घुमटकर, प्रा.डॉ.उज्वला मेहरे,मा.नंदाताई बनसोड यांनी चित्रपट कलाकारांचे अभिनंदन केले.राजलक्ष्मी सिनेमा गृहात झालेल्या सत्कार सोहळ्याचे संचालन प्रा.अरुण बुंदेले यांनी तर आभार श्री प्रशांत गवई यांनी मानले.