शहरातील विकास कामाची पाहणी करण्याची कोरेगाव नगरपंचायतीची मागणी

133

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18जानेवारी):-सातारा जिल्ह्यातील सातारा – पंढरपूर रस्त्यावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन कोरेगाव शहरात सध्या सुरू असलेल्या विकास कामाची स्वतः पाहणी करून त्यात काही चुकीचे आढळल्यास योग्य ती कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, कोरेगाव नगरपंचायतीच्या काही कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी काही कामांबाबत शंका उपस्थित करून या कामाची चौकशी व्हावी. यासाठी कोरेगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनामुळे काही व्यक्तींना कोरेगाव शहराची बदनामी होत असल्याचा साक्षात्कार झालेला आहे. आंदोलनाला वाढता पाठींबा मिळत असल्याने हे आंदोलन थांबवण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहे पण लोकशाही मार्गाने आंदोलन थांबवण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे त्यामुळे आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेण्यात आली.

लोकशाही मार्गाने प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन करणे. हा मार्ग न निवडता आंदोलकाची व शासकीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नीचा उल्लेख करून निवेदन दिलेले आहे .मुळातच एका शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांचा कोणताही सहभाग नसताना त्यांचा उल्लेख करून कोरेगाव नगरपंचायतीने लेटर पॅड चा गैरवापर केलेला आहे. महिला वर्गाला पुढे न करता एका मागासवर्गीयाला पुढे करून जातीय सलोखा करण्याऐवजी दबाव तंत्र वापरले असल्याचा आरोप आता सर्वत्र होऊ लागलेला आहे.

मुळातच शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून कंट्रक्शन व्यवसाय जर कोणी करत असेल त्याबाबत शासकीय पातळीवरील सक्षम यंत्रणा कारवाईस करण्यासाठी कोणत्याही मुलाहिजा ठेवत नाही. परंतु काही ठराविक व्यक्तींना टार्गेट करून कोरेगाव नगरपंचायतीमधील सत्ताधारी प्रमुखांनी आमदार महेश शिंदे यांचे नाव घेऊन जावक क्रमांक विकास कामे / २०१/ २०२३-२४ दिनांक १८/०१/२०२४ गुरुवार नुसार निवेदन दिलेले आहे. या निवेदनावर पोहोच असून आमदार विकास कामे करत असून त्यांचे महत्त्व वाढवलेले आहे .त्यांच्या नावलौकिक होईल म्हणून त्यांची बदनामी केली जात आहे. असा शोध लावलेला आहे.

मुळातच लोकशाही मार्गाने आंदोलन करते रमेश उबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्याबाबत कोणताही खुलासा न करता व्यक्तिगत पातळीवर बदनामी करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरू झालेले आहे. कोणत्याही मार्गाने केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. परंतु संबंधित शासकीय यंत्रणेकडे दाद मागणी ऐवजी काही ठराविक व विशिष्ट हेतूने लोकांना एकत्र करून षडयंत्र सुरू केलेले आहे. याला कोरेगावातील करदाते नागरिक भिक घालणार नाही. मुळातच हे निवेदन देण्यासाठी काही नगरसेवक गैरहजर असतानाही त्यांचा निवेदनावर उल्लेख केलेला आढळून आलेला आहे .

दरम्यान,याबाबत सातारचे जिल्हाधिकारी यांनी स्वातंत्र्य यंत्रणेमार्फत चौकशी करून आंदोलकांनी केलेल्या मागणीची शहनिशा करून दोषीवर कारवाई करावी. यामध्ये दोषी आढळल्यास हरित कारवाई करावी. दोन्ही बाजू समजून घेऊन योग्य ते निकष काढून ही कारवाई झाली पाहिजे कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई झाल्यास खऱ्या अर्थाने जिल्हा प्रशासन व लोकशाही याबद्दल लोकांना आदर वाटेल. कोरेगावातील करदात्यांना नागरी सुविधा न देता त्यांना वेठीस धरणारी कोरेगाव नगरपंचायत बरखास्त करावी. अशी भविष्यात मागणी पुढे येऊ शकते .

याबाबत कोरेगाव नगरपंचायतीच्या संबंधित निवेदन दात्यांकडे संपर्क साधला असता त्यांनी कोरेगाव नगरपंचायत विकास अडथळा आणून कोरेगाव शहराचे बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी. असे निवेदन दिल्याचे सांगितले . कोरेगाव शहरांमध्ये सार्वजनिक व खाजगी बँका सुरक्षित असून दारूच्या दुकानाची दरोडा व चोऱ्यामाऱ्या होत आहे. त्याची कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद सुद्धा झालेली आहे. याकडे कोरेगाव नगरपंचायतीने लक्ष देऊन सुरक्षितता वाढवावी व कोरेगाव शहराची होणारी बदनामी थांबवावी. अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे .

राजकारणामध्ये दल बदलूपणा केल्यानंतर विचार बदलतात ज्यांच्या वरती आरोप केले जातात ते सोबत असले तिथे चांगले व ते विरोधात गेले की वाईट हे सर्वत्र घडत आहे त्याला कोरेगाव अपवाद नाही वास्तविक पाहता कोणत्याही विकास कामाला कुणीही अडथळा आणू नये कारण सध्या शासकीय निधीचा योग्य वापर झाला पाहिजे जर योग्य वापर झाला नाही तर पैशाची भांडण पैशाने मिटवण्याची प्रवृत्ती वाढेल. हे सुद्धा अधोरेखित झालेले आहे.