चिमुर मध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सिने कलावंत प्राजक्ता माळी येणार

361

🔸३१ जानेवारी ला बक्षीस वितरण व हळदी कुंकू कार्यक्रम

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.19जानेवारी):- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात भाजप महिला आघाडी तालुका चिमूरच्या वतीने आयोजित गायन स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा व कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा व हळदी कुंकू कार्यक्रम दिनांक ३१ जानेवारी बुधवार दुपारी १२ वाजता अभयंकर मैदान येथे आयोजीत केले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बंटीभाऊ भांगडिया तर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सिने कलावंत प्राजक्ता माळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

प्रमुख पाहुणे भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भाजप प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे, वसंतभाऊ वारजूकर, भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजु भाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीषभाऊ तुंम्पलीवार, महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. ममताताई डुकरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे, माजी नप अध्यक्ष सौ शिल्पाताई राचलवार, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे, युवा नेते समीर राचलवार, विशेष अतिथी भांगडिया फाउंडेशनच्या संचालिका सौ. मेघाताई भांगडिया, सौ. मनीषाताई भांगडिया, सौ. अपर्णाताई भांगडिया, सौ आरतीताई भांगडिया, जीप माजी उपाध्यक्ष श्रीमती रेखाताई कारेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीमती रेखाताई मालोदे, भाजप जेष्ठ नेत्या सौ ज्योतीताई ठाकरे, जेष्ठ नेते निलमभाऊ राचलवार, प्रकाश वाकडे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे, सहकार आघाडी ओमप्रकाश गनोरकर, मच्छिमार आघाडी दिवाकर डहारे, अनुसूचित जाती आघाडी जयंत गौरकर, अनुसूचित जमाती आघाडी गजानन गुळधे, शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, जेष्ठ नेते कमलाकर लोणकर, जेष्ठ नेते घनश्यामजी डुकरे उपस्थित राहणार आहे.

महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. मायाताई ननावरे, सौ गीता लिंगायत, सौ आशा मेश्राम, सौ भारती गोडे, सौ वर्षा शेंडे, सौ वर्षा लोणारकर, सौ दुर्गा सातपुते, सौ अरुणा ननावरे, सौ रत्नमाला मेश्राम, सौ छाया कंचर्लावार, सौ ललिता चौधरी, सौ निता लांडगे, सौ अनुराधा बोरकर, सौ छबू आत्राम, सौ प्रतिभा गेजिक, सौ नलिनी लांडे, सौ कल्याणी सातपुते, सौ प्रिया जयकर, सौ अलका बोरतवार, नाझमा शेख, नसिमा शेख, सौ पुष्पा हरणे, सौ मंजुषा मुंगले, सौ दीपाली बानकर, सौ मंजुषा ठोबरे, सौ योगिता गोहने, सौ रंजना खेडकर, सुनीता जाभुळे, सौ रोहिणी नवघडे यांनी केले आहे.