कला क्रीडा संस्कृतीमध्ये विद्यार्थी निपुण व्हावा : डॉ.श्याम शिंदे

81

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.21जानेवारी):-आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थी पुस्तकी किडा न बनता अभ्यासाबरोबरच तो कला, क्रीडा, संस्कृती यातही निपुण व्हावा,म्हणजे त्याचा शैक्षणिक व मानसिक विकास होतो आणि तो पुढील आयुष्यातील कोणत्याही स्पर्धेत टिकून राहू शकतो*, असे प्रतिपादन सप्तरंगचे अध्यक्ष डॉ.श्याम शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ संस्थेचे महाराष्ट्र पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज,सावेडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.युवराज पोटे हे होते.यावेळी विचारपिठावर अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र बारस्कर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक,सचिव सुनील गोसावी, राजेंद्र चोभे,प्राचार्य अंकुश दराडे, संस्थेच्या अध्यक्ष स्वाती दराडे – आव्हाड,मुख्याध्यापक सुशांत श्यामलेट्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शब्दगंध चे सुनील गोसावी म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक, व्यवहारिक ज्ञान हे अनुभवातून मिळत असते, या शाळेत विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी उत्तम प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी खेळाच्या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राज्यस्तरावर खेळाला उत्तम यश मिळवणाऱ्या मुलांचे सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. राजेंद्र चोभे यांनी शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण व परिपूर्ण बनविणारे असावे, असे शिक्षण या शाळेत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, हे आशादायी चित्र असून सर्व शिक्षकांच त्यांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.युवराज पोटे यांनी ६० पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शून्यातून शाळा उभारणी होत असताना पालक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मागील बारा वर्षात शाळेने प्रगती करून ५०० पेक्षा जास्त स्कॉलर विद्यार्थी, खेळाडू, डॉक्टर,इंजिनिअर समाजासाठी घडविले. त्याबद्दल अभिनंदन केले.

सामाजिक जाणीव असल्यानं तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण व व्यक्तिमत्त्वावर चांगला संस्कार घडवण्यासाठी प्रयत्न केले यासाठी चांगले शिक्षकाची गरज असते आणि असा शिक्षक ग्रुप आम्हास लाभला, प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी,पालकांचा उत्तुंग सहभाग असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आम्हास करता येत आहे. असे उददगार प्रास्ताविकातून प्राचार्य अंकुश दराडे यांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंयोजन प्रा. शुभांगी काटे यांनी केले. बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे अध्यक्षा सौ.स्वाती दराडे – आव्हाड, प्रशासक प्रणव दराडे, मुख्याध्यापक सुशांत सामलेटी यांचे सह सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

जिल्हा व राज्य स्कॉलरशिप फेसिंग मध्ये रोप्य व कांस्यपदक मिळवणारे विद्यार्थी कु.सृष्टी धाकतोडे, कु. झिर्क्रा खान, गौरव जरे,सम्यक लोढा, संचिन बागवानी, माहीर कपूर, पार्थ झवर या सर्वांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने रामायणातील घडलेल्या घटनांवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर केले.छोट्या मुलांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनावरील नाट्य सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना नृत्य अभिनय व नाटक शिकविणारे शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते.