पुसद वकिल संघाचे नुतन अध्यक्ष ॲड.रविंद्र रूडे यांचा अशोक भालेराव यांच्या कडून जाहीर

124

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

पुसद(दि.22 जानेवारी):-नुकत्याच पार पडलेल्या पुसद वकिल संघाच्या अध्यक्षपदी ॲड.रविंद्र रूडे साहेब यांची निवड झाल्याबद्दल भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात करण्यात आला.

तत्पूर्वी स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्य घटनचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर पुसद वकिल संघाचे नुतन अध्यक्ष ॲड.रवींद्र रूडे साहेब यांचा जाहीर सत्कार भीम आर्मी भारत एकता मिशन चे अध्यक्ष अशोकभाऊ भालेराव व त्यांच्या संपुर्ण टीम ने नूतन अध्यक्षाचा शाल, पुष्पहार घालून जाहीर सत्कार केला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.अशिषभाऊ देशमुख सदस्य महाराष्ट्र व गोवा बार व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.भारतभाऊ जाधव हे उपस्थित राहणार होते परतू काही अडचणी मुळे ते येऊ शकले नाही.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.मनोज घाडगे पाटील हे होते.प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड.सुरेश पवार व ॲड.शिवाजी खराटे ॲड.कैलास राठोड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.दिलीप पवार ॲड.गोपाल मस्के,ॲड.तनवीर खान,ॲड.नय्यर खान,ॲड.दिनेश राठोड,ॲडअभिजित राठोड,ॲड.केशव राठोड हे वकिल मंडळी उपस्थित होते.ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.शिवाजी खराटे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सत्कारमुर्ती ॲड.रवींद्र रूडे साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना जीवनातील समाज सेवेत कशाप्रकारे महत्व देतो व सर्वांच्या मदतीने आपली निवड कशी झाली याबद्दल थोडक्यात माहिती दिली.त्याचबरोबर भीम आर्मीचे आभार व्यक्त करून मी नेहमीच आपला ऋणी राहील व जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा आपणासाठी उपलब्ध असेल असा शब्द भीम आर्मी संघटनेला दिला.

या कार्यक्रमाला दादाराव चिरंगे सर,सुनील बोडखे,धनराज कांबळे,खंदारे सर, अजय लोखंडे,प्रमोद धुळे,वैभव सुर्यवंशी,उत्तम धबाले,देवानंद इंगोले,शुभम खडारे,रोहन राऊत,शुभम ढोले,शिलानंद कांबळे, धीरज खिलारे,युवराज कोल्हे,प्रेम साळवे,राहुल धुळे,रुपेश सुर्यवंशी,रवी खंदारे,सूरज खिलारे,सुफियान शेख इत्यादी भीम आर्मीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच बाबाराव उबाळे,लक्ष्मण कांबळे,इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंदारे साहेब यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अंबादास वानखेडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.अमोल भालेराव यांनी केले.