जिल्हा परिषद कर्मचारी संघाकडे प्रथम विजेता तर पत्रकार क्रिकेट क्लब ठरला द्वितीय परितोषिकचा मानकरी

118

 

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.22जानेवारी):-जिल्हा परिषद कर्मचारी क्रिकेट संघाने कमालीचे प्रदर्शन करीत पत्रकार चषक 2024 चे प्रथम पारितोषिक पटकाविले. तर द्वितीय विजेता म्हणून पत्रकार क्रिकेट क्लबला मान मिळाला.

पुसदच्या वतीने 20 व 21 जानेवारीला पत्रकार चषक 2024 चे आयोजन करण्यात आले होते. 20 जानेवारीला सकाळी दहा वाजता यशवंत स्टेडियम येथे या चषकाचे उद्घाटन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड आशिष देशमुख हे होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गाडे, पुसद नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम, रावजी फिटनेस क्लब चे संचालक वैभव फुके, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक पुसदचे अध्यक्ष अनुकूल चव्हाण, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी ग्यानचंदानी, तथा स्वागत अध्यक्ष म्हणून पत्रकार क्रिकेट क्लब पुसदचे आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार क्रिकेट क्लबचे कर्णधार मारोती भस्मे हे मंचावर उपस्थित होते.

या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शरद मैंद यांनी उद्घाटन करून महसूल संघ व जिल्हा परिषद कर्मचारी संघास शुभेच्छा देऊन चषकला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी महसूल संघ विरुद्ध जिल्हा परिषद कर्मचारी संघ, नगरपालिका शिक्षक संघ विरुद्ध कृषी विभाग संघामध्ये तर पत्रकार संघासोबत वनविभाग क्रिकेट संघ तसेच पंचायत समिती अभियंता विरुद्ध नगरपालिका आरोग्य विभाग यांच्यामध्ये सामने रंगले. सामन्यामध्ये उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट बॉलर व क्षेत्ररक्षणाचे उत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले.

त्यामधून आज 21 जानेवारी रोजी पत्रकार क्रिकेट क्लब विरुद्ध कृषी विभाग व जिल्हा परिषद कर्मचारी संघ विरुद्ध आरोग्य विभाग यांच्या मध्ये सेमी फायनल चा सामना रंगला. त्यामधून विजेत्या ठरलेल्या पत्रकार क्रिकेट क्लब विरुद्ध जिल्हा परिषद कर्मचारी संघामध्ये फायनल चा सामना रंगला. यामध्ये शिक्षक संघाने उभा केलेल्या धावसंख्येचा शिखर पार करण्यास पत्रकार संघाला यश आले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघाने पत्रकार चषक 2024 पटकावला. शिक्षक संघाने प्रथम पारितोषिक ट्रॉफी पटकाविल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. तर उपविजेत्या ठरलेल्या व या चषकाचे द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या संघामध्ये पत्रकार क्रिकेट क्लबचे नाव कोरले गेले.

बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले, पुसद वकील संघाचे जेष्ठ सदस्य ॲड अनिल ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते विजय भेलके, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, माजी नगरसेवक साकिब शाह, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण कांबळे, या मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची चषक ट्रॉफी जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे कर्णधार मधुकर मोरझडे व त्यांच्या टीमला देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाची चषक ट्रॉफी पत्रकार क्रिकेट क्लबचे कर्णधार मारोती भस्मे व त्यांच्या टीमला देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अंतिम सामन्यात सामनावीर तसेच उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी देवानंद रावते यांना मिळाली तर मालिकावीर ट्रॉफी फैज खान यांना आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विजय निखाते ट्रॉफी देण्यात आली.

दोन दिवसीय पत्रकार चषक 2024 च्या आयोजन नियोजन व यशस्वीतेसाठी पत्रकार चषक 2024 चे आयोजन समितीचे अध्यक्ष मारोती भस्मे, सचिव बाबा खान, व विजय निखाते, उपाध्यक्ष विनय कुमार राठोड, सल्लागार ॲड अनिल ठाकूर, दिनेश खांडेकर, तसेच ऋषिकेश जोगदंडे, रवी देशपांडे, फैज खान, कुलदीप सुरोशे, शेख शारिख, मनीष दशरथकर, उमेश जाजू, राजु सोनुने, राहुल सुरोशे, प्रशांत राठोड, आकीब रिझवी, बाबाराव उबाळे, यांनी अथक परिश्रम घेतले. तर दोन दिवसीय चाललेल्या या क्रिकेट सामन्यांचे उत्कृष्ट पंच म्हणून सागर गायकवाड, सुरज सुरोशे, अजय बोधने, तर समालोचक संदीप बहादुरे व दीपक हरीमकर यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बहादुरे यांनी तर प्रास्ताविक पत्रकार चषक 2024 चे अध्यक्ष मारोती भस्मे यांनी तर उपस्थितांचे आभार जेष्ठ पत्रकार बाबाराव उबाळे यांनी मांनले.