सांगली जिल्ह्यातील भटकेविमुक्त जमातींच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न

188

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.24जानेवारी):-सांगली जिल्ह्यातील भटक्या जमातीतील प्रमुख प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक इस्लामपूर येथे पार पडली.

यामध्ये जिल्ह्यातील सर्व भटक्या संघटनांची एकत्रित कल्याण समिती स्थापन करणे, भटक्या जमातीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची प्रबोधन कार्यशाळा आयोजित करणे, सांगली जिल्ह्यातील भटक्या जमातीचा भव्य मेळावा आयोजित करणे , जातीचे दाखले व इतर प्रश्नबाबत जिल्हाधिकारी, समाजकल्याण सहा.आयुक्त यांची भेट घेणे.याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक तालुक्यात संघटन बांधणी करण्याचे ठरविण्यात आली.

यावेळी जातीनिहाय जनगणना,गायरान जमीन, नागरिकत्व दाखले, रेशनिंग प्रश्न, घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, शिष्यवृत्ती, अन्याय अत्याचार या विषयावर चर्चा झाली.

भटक्याविमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव जाधव,भटक्या जमाती विकास मंचचे सतिश शिकलगार मिरज, तालुकाध्यक्ष धनाजी मोकाशी नवेखेड.सांगली जिल्हा भटकेविमुक्त विकास मंचचे सागर माने विटा, भटकेविमुक्त कल्याण समितीचे निमंत्रक मुनीर शिकलगार विटा, नंदिवाले समाजाचे जिल्हाध्यक्ष मोहन भिंगाडे इस्लामपूर,डोंबारी समाजाचे रमेश जावळे इस्लामपूर, पुजाताई मोरे आष्टा,बागडी समाजातील रेशमाताई माने तुंग, सामाजिक कार्यकर्ते परशुराम दोरकर मिरज.बांधकाम कामगार संघटनेचे अहमद मुंडे इस्लामपूर यांनी मनोगत व्यक्त केले.यामध्ये सर्वानी भटक्या समाजाच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्यावर एकमत दर्शविले.तर स्वप्नील पोतदार इस्लामपूर श्रीकांत नाथगोसावी,ओंकार लाखे इस्लामपूर,संपत माने ,प्रशांत पाथरूट मिरज हे कार्यकर्ते उपस्थित होते.