साताऱ्यात माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या भेटीने ग्रामपंचायत संगणक परिचारिकांना मिळाला तात्पुरता दिलासा

1839

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.24जानेवारी):-गेली नऊ दिवस सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर आपल्या न्याय मागणीसाठी ग्रामपंचायत संगणक परिचारिका यांनी आंदोलन केलेले आहे. या आंदोलनाच्या नवव्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी सत्वशीला भाभी चव्हाण यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान आंदोलकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

सदर मागण्यांची पूर्तता व्हावी. यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर राज्य अध्यक्ष श्रीमती सुनिता किशोर आमटे, सचिव नारायण मोठे, उपाध्यक्ष कुमारी अबोली अवसरे, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्यासह अनेक परिचारिका या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंधात घेऊन किमान वेतन देण्यात यावे… तात्काळ शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन (२२,६००) इतके मानधन देण्यात यावे.

CSC-SPV कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तात्काळ बंद करण्यात यावे.कंपनीने विनाकारण लावलेले टार्गेट बंद करण्यात यावे.आतापर्यंत आमच्या हक्काचा पीएफ भविष्य निर्वाह निधी आमच्या खात्यात ताबडतोब जमा करण्याचे ओदश देण्यात यावेत. दिलेले संगणक (कॉम्युटर) व प्रिंटर हे २०११ साली देण्यात आलेले आहे. ते नादुरुस्त झालेले आहेत. ते सर्व कॉम्युटर व प्रिंटर नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेला देण्यात यावे. या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाच्या वेळेला श्रीमती सुनिता किशोर आमटे यांची प्रकृती हरवल्यामुळे खालवल्यामुळे त्यांना तातडीने उपचार करणे गरजेचे आहे हे त्यांना पटवून सांगितल्यानंतर त्यांनी औषध उपचार घेण्यास सुरुवात केली या आंदोलनाला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार आमदार व अनेक अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे पण अद्यापही प्रश्न न सुटल्यामुळे हे गतिमान सरकार आहे की रक्कडपट्टी करणारे सरकार आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान गेली नऊ दिवस या आंदोलनाकडे अनेक आणि दुर्लक्ष केले पण माजी मुख्यमंत्री यांची पत्नी सत्वशीला भाभी चव्हाण यांनी सुमारे एक तास वेळ देऊन या आंदोलकांचे म्हणणे जाणून घेतले या वेळेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे व वैद्यकीय पथक तसेच मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. यावेळी आंदोलकांना अक्षरशा रडू कोसळले होते.