जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनीत न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर प्रथम

71

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27जानेवारी):-नुकतेच ५१ वे जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शन 2024 चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर येथे संपन्न झाले.

या प्रदर्शनीत विविध शाळेतील एकुण १३० विज्ञान प्रतिकृतींचा सहभाग होता. शाळेचे निवडक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांनी या तीन दिवशीय विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेतला.या प्रदर्शनीत गैर आदिवासी गटातून न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा विद्यार्थी यश विजय वाकडे याने Autonomous Spraying Robot ही विज्ञान प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. या प्रतिकृतीचे मार्गदर्शक शाळेचे शिक्षक प्रशांत लढी व सर्व विज्ञान शिक्षक होते.

यापुढे सदर प्रतिकृती सावंतवाडी येथे होवू घातलेल्या राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शनात सादर होणार आहे. यश वाकडे याने यापूर्वी तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. अतिशय मेहनत व परिश्रमाने त्याने जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानंतर त्याच्या डोळ्यातील अश्रुंना त्याने वाट मोकळी केली.

यश वाकडे याने जे सुयश प्राप्त केले त्याबद्दल शाळेचे संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद,पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन व कॊतुक केलेले आहे.