जलसागर चा मासा पाटबंधारे विभागाच्या नरड्यात बसला रुतून,, कारवाईसाठी आंदोलन

118

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.25जानेवारी):-सातारा- मेढा रस्त्यावरील गोगावले वाडी येथील जलसागर हॉटेल व येथील आंबळी लोकप्रिय आहे. यावर ताव मारण्यासाठी अनेक जण जातात. पण ,सध्या सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जलसागर हॉटेलचे अतिक्रमण दूर करण्यासाठी सारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केल्यामुळे पाटबंधारे विभाग व संबंधितांना आता माशाचा काटा चांगला रुतू लागल्याचे दिसून येत आहे.

 खरं म्हणजे कण्हेर धरणाच्या निर्मितीमुळे जलसंपदा तथा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेली ही जमीन हॉटेल उद्योजक व जलसागर चे मालक अरुण कापसे यांना भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. परंतु ,आता ही जमीन परत न देता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. सुरुवातीला 55 चौरस फुटाची खानावळ होती. आज त्याचा एवढा विस्तार झालेला आहे की, आता कण्हेर धरण सुद्धा ताब्यात घेतले तर आश्चर्य वाटणार नाही. कारण, मांजर दूध पिताना डोळे मिटत असली तरी इतरांचे डोळे उघडे असतात. त्यामुळेच तर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आंदोलनामुळे पाटबंधारे विभागाला आता जाग आलेली आहे.

अनेकदा या विभागाचे अधिकारी व स्वतःला पुढारी समजणारे अनेक नामांकित व्यक्ती माशावर तव मारत होते. आता हाच मासा सुशांत मोरे यांच्या आंदोलनामुळे काहींच्या नरड्यातरुतून बसला असल्याचा भास निर्माण झालेला आहे.सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक आंदोलन होतात पण सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आंदोलनाला चांगले यश मिळते. त्यामुळे जल सागरची मेहरबानी व पाटबंधारे विभागाची जागा आता मोकळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे हे स्वस्त बसणार नाहीत अशी आता धारणा सातारा जिल्ह्यातील न्यायाची मागणी करणाऱ्या व्यक्तींकडून होत आहे.सद्या न्याय प्रविष्ट बाब असली तरी पाटबंधारे विभागावर अन्याय होऊ नये . अशीच भावना निर्माण झालेली आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाने प्रचलित धोरणानुसार कागदी घोडे नाचून शासनाचीच घोर फसवणूक केली आहे का याचीही तपासणी होणे गरजेचे आहे

कारण,मौजे – गोगावलेवाडी ता.जि.
सातारा यांना सातारा मेढा रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या जलसंपदा विभागाचे जागा खाणावळ व्यवसाया करीता ५५ चौ.मी. श्री.अरूण बाजीराव कापसे यांना सन २००५ ते २०१०
पर्यंत भाडेतत्वावर देणेत आलेली होती. तद्नंतर श्री. कापसे यांना सदरचे जागेबाबत कोणतीही मुदतवाढ जलसंपदा विभागा मार्फत देणेत आलेली नाही. या खाणावळ व्यवसाय करणे करिता देण्यात आलेली जागा रिकामी करणे बाबत श्री.कापसे यांना वेळोवेळी नोटीस बजावणेत आलेल्या आहेत. श्री. कापसे यांनी सदरचे अनधिकृत खाणावळ व्यवसाय काढणेत येवू नये म्हणून सातारा येथील दिवाणी न्यायालयात रे.दि.मू ४५१/२०२१ नूसार दावा दाखल केला आहे.

तरीही जलसागर हॉटेलला जलसमाधी मिळत नाही या पाठीमागे कोणते अधिकारी व लोकप्रतिनिधीचा हात आहे हे न सोबत द्यायची सातारा तालुक्यातील जनता खुळी नाही पण पैशाची भांडण पैशानेच मिळतात याची एकदा पुन्हा एकदा खात्री पटल्यामुळे जलसागरचा विस्तार हा आता न्यायालयाला बी आव्हान देऊन त्यावर अन्यायाची बोट चालवेल का? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

दरम्यान या जनसागर हॉटेलच्या अतिक्रमणाबाबत न्यायालयाने जनतेचे हित पहावे व तातडीने निर्णय घ्यावा. जलसागर हॉटेलचे अतिक्रमण म्हणजे कोणत्याही जातीचे आरक्षणाचा प्रश्न नाही तर हा प्रश्न भाडेतत्त्वावर आणखीन किती जमीनचा वापर करायचा ? याचाच असल्याचे सिद्ध होत आहे.