मराठा आरक्षण जाहीर केल्याबद्दल साताऱ्यात रिपाइं (गवई गट) शाखा उद्घाघाटन….

57

✒️सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.28जानेवारी):-छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या सातारा भूमीत क्रांतीचे बीज लावले जाते. या सातारा भूमीतील वर्णे ता. सातारा येथे एक मराठा.. लाख मराठा.. घोषणा देणाऱ्या मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण देण्याचे अध्यादेश काढले आहेत. त्याचे स्वागत म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रा. सु.गवई गट) रिपाइं पक्ष शाखा उद्घाघाटन करण्यात आले. याबद्दल सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी रिपाइं सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजेंद्र गवई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात जोमात काम सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की सातारा जिल्ह्यात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्णे गावामध्ये रिपाइं गवई गटाची शाखा उघडण्याची चर्चा करण्यात आली होती. त्याचवेळी महायुतीच्या राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अध्यादेश व त्याची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या हाती सुपूर्द केली. याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी वर्णे गावात रिपाइं गवई गटाची शाखा उघडण्याचा निर्णय झाला आणि फटाक्याची आतिषबाजी व जयघोष करत त्याचे अधिकृतरित्या उद्घाघाटन करण्यात आले.

वर्णे गावात सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून समतेचा नारा दिला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा युगपुरुषांच्या विचारांना चालना देण्याचे काम रिपाइं (गवई गट) करत आहे .आज सातारा जिल्ह्यामध्ये गवई गटाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला असून गाव तेथे शाखा अशा पद्धतीने कासव गतीने का होईना. पण वाटचाल सुरू झालेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये गवई गटाचे मत कोणत्या पक्षाकडे जाईल. त्या पक्षाला विजय निश्चित होणार आहे. एवढेच नव्हे तर सध्या रिपाइं पक्षाची ताकद वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे. आज वर्णे तालुका सातारा येथे झालेल्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र मध्ये मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय विरोधात दलित असा संघर्ष करून सत्ता मिळवून अनेकांनी प्रयत्न केला. पण, सध्या सर्व जाती धर्मातील लोक सुज्ञ झालेले आहेत. संविधानाचे विचार आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जात आहेत. अशा वेळेला मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सरकारला गुडघ्यावर आणले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली . घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती.. एक मत.. एक अधिकार निर्माण करून राजेशाही गाडली आहे व मतदारांना राजा बनवले आहे .अशा शब्दात सातारा जिल्हा अध्यक्ष संजय गाडे यांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला वर्णे गावचे सुपुत्र शिवाजीराव धसके ,विजय धसके, रोहिणी माने पायल गाडे, रेखा सकटे ,मनीषा कदम, विशाल कांबळे, सुरज मुलाणी, सुहास मोरे , फीलीप बांबळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे सातारा जिल्ह्यात प्रथमच राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे अध्यादेश काढल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे शाखा उद्घाघाटन करून आनंद उत्सव साजरा केलेला आहे. या अभिनव उपक्रमाबद्दल वर्ण ग्रामस्थांनी गवई गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानलेले आहेत. ही परिवर्तनाची लढाई आहे यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक सामील झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या ऋणात राहणेच पसंत करीन. असे शेवटी श्री गाडे यांनी स्पष्ट केले.

या गावातील विविध विकास कामांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट सदैव तत्पर व तयार राहील. आता गरजू व गरीब मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मिळावे. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट लक्ष ठेवून आहे. तसेच इतर मागासवर्गीय व मागासवर्गीयांना त्यांच्या न्याय हक्कापासून कुणी वंचित ठेवू नये. यासाठी ही डोळस पणे घ पहारे करी बनेल. असेही स्पष्ट केले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ व विविध मंडळाचे तसेच विकास सेवा सोसायटीचे सदस्य, शेतकरी, महिला वर्ग व विविध जाती धर्मातील सामान्य कार्यकर्ते उपस्थित होते.