EVM हटाव देश बचाव, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या

545

🔸भारतीय बौद्ध महासभेचे निवेदन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30जानेवारी):-दिनांक 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान संपूर्ण भारतात लागू झाले असून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या चार मूलभूत तत्त्वावर
आधारित असून धर्मनिरपेक्षता हा त्या संविधानाचा गाभा आहे.

परंतु अलीकडे EVM संबंधी भारतीय जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून आपण EVM द्वारे दिलेले मत त्याच प्रतिनिधीला मिळेल की नाही याबाबत शंका अधिक दृढ होत चाललेली आहे. व त्या प्रकारचे EVM बाबतचे वातावरण संपूर्ण देशात दिसत आहे ही लोकशाही प्रजासत्ताक देशासाठी घातक असल्यामुळे स्वच्छ व निपक्षपणे वातावरण सण 2024 ची व त्यापुढील निवडणूक होण्यासाठी आम्ही EVM हटाव देश बचाव यासाठी हे निवेदन देत आहोत कृपया यावर योग्य विचार होऊन मत पत्रिकेद्वारे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.

यासाठी हे निवेदन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका पुसद शाखा पुसद यांच्यावतीने आज दिनांक 29 जानेवारीला उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय पुसद येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आले.

यावेळी भारत कांबळे, तुकाराम चौरे, प्रल्हाद खडसे, मिलिंद जाधव, विजय बाबर, डॉ. अरुण राऊत, बुद्धरत्न भालेराव, रामदास सावळे, देविदास इंगळे, भोलानाथ कांबळे, मुकिंदा ढोले, विनोद कांबळे,अशोक कदम, भोजराज कांबळे, भास्कर बनसोड, कैलास सूर्यवंशी,पी.सी शेळके. तसेच महाविरनगर ,तथागत नगर, शिवाजी वार्ड, भिमवाडी, मुखरे चौक, सुदर्शन नगर, सुभाष वार्ड. या शाखेतील महिला व पदाधिकारी उपस्थित होते.