भारतीय विद्यार्थी युवा मोर्चाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

42

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30जानेवारी):-मौजे लोणी ता.पुसद जि. यवतमाळ येथे भारतीय विद्यार्थी व युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षक मा.विद्वान केवटे (राष्ट्रीय महासचिव भारतीय युवा मोर्चा, नवी दिल्ली) यांनी उपस्थित विद्यार्थी व युवा यांना सविस्तर व प्रभावी वाणीने प्रशिक्षण दिले. “महापुरुषांच्या विचारातील देश व समाज घडवायचा असेल तर मुलनिवासी बहुजन महापुरुषांचा खरा इतिहास जाणून घ्यावा लागेल, युवकांचा धार्मिक राजकीय आणि जातीय दंगलीत होणारा वापर हा युवकांना जागृत करून त्यांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण केल्याशिवाय थांबणार नाही तसेच ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही आधुनिक मनुस्मृति आहे. “

इत्यादी विषयावर त्यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा. गणपत गव्हाळे यांनी केले.

मा.अनिल रत्ने (सरपंच), मा. विवेकानंद कांबळे (पोलीस पाटील), बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हाध्यक्ष मा. बंडूभाऊ गंगावणे, मा. अविनाश भवरे, प्राध्यापक शरद कांबळे (प्रोटान तालुका सचिव) राष्ट्रीय किसान मोर्चाचे मा. देवराव पाईकराव, मा. कैलास मनवर,मा.प्रभू केवटे, मा. साहेबराव पुलाते,मा. रमेश गायकवाड, मा.साहिल रोकडे (भा.विद्या.मोर्चा शहर अध्यक्ष) इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व स्वातंत्र्याची दोन आंदोलने हे पुस्तके देऊन प्रशिक्षकांच्या हस्ते करण्यात आले

प्रशिक्षणाचे प्रास्ताविक मा. भगवान हनवते ( बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा प्रभारी) यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी मा. भारत कांबळे (राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हा प्रभारी) यांनी तर
आभार भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा सचिव मा. रोहित कांबळे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. सुमित मनवर,मा. सुरज मनवर, मा. भैय्यासाहेब मनवर, मा. पवन मनवर, मा. निखिल गायकवाड, यांनी अथक परिश्रम घेतले प्रशिक्षणाला महिला व बाहेरगावाहून सुद्धा बरेचसे विद्यार्थी व युवा उपस्थित होते.