गंगाखेड मधून मुस्लिम आरक्षणाची मागणी. मा.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदना द्वारे केलीमागणी

224

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30जानेवारी):- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाज आर्थिक दृष्ट्या व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असून दैनंदिन जीवनामध्ये महागाईच्या काळात जीवन जगणे कठीण झाले असुन.मुस्लिम समाज सद्य परिस्थितीला अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.

त्यामुळेच मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिल्यानंतर मुस्लिम समाजाचे शैक्षणिक,आर्थिक मागासलेपण दूर होईल आणि यातूनच नवीन पिढीला भविष्यातील मुला बाळांची मोठी आर्थिक समस्या दूर होईल.असे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर अब्दुल सलीम जानीमिया म्हटले आहे.

निवेदनावर हसीन शेख, अयशा शेख,खाजाबी शेख,साबेराबी शेख,वसीम शेख,अफसान शेख,रुकसा पठाण,अस्मा शेख, रुकसाना शेख, या वेळी प्रामुख्याने महिलांची उपस्थित होत्या.