धनगर आरक्षण मागणीसाठी शासनाचा निषेध म्हणून माण तालुक्यात कडकडीत बंद ; सर्व व्यापाऱ्यांचा दुकानें बंद ठेवून उपोषणकर्त्यांना पाठिंबा

364

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.1फेब्रुवारी):-म्हसवड, ता. माण येथे धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला असून प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी आज माण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला याला व्यापारी वर्गाकडून आपली दुकाने बंद ठेऊन पाठिंबा देणेत आला.

आज सकाळी धनगर समाजातील शेकडो कार्यकर्ते उपोषण स्थळी एकत्र जमले होते यावेळी म्हसवड शहरातून कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली यावेळी उपोषणकर्ते एकटे नसून संपूर्ण धनगर समाज त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्धार यावेळी समाजाकडून संदेश देणेत आला आहे.

धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण राज्य घटनेने दिलेले आहे, मात्र त्याचा लाभ या समाजाला शासन देत नाही. आमच्या हक्काचे हे आरक्षण शासनाने जाहीर करावे यासाठी म्हसवड पालिकेसमोर दि. २६ जानेवारी पासून उत्तम विरकर, गणेश केसरकर, प्रकाश हुलवान या तीन जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, मात्र त्यांच्या उपोषणाला गेली आठ दिवस उलटले असले तरी अद्याप प्रशासनाने त्यांची दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ धनगर समाज, इतर सर्व समाज आणि व्यापारी वर्गाने आज उत्स्फूर्त पाठीबा देत बंद पाळून धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा दर्शवीला.

आज उपोषण स्थळी प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली यावेळी जो पर्यंत महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवीत नाही तो पर्यत आम्ही इथून उठणार नसल्याचे उपोषणकर्ते म्हणाले. यावेळी गळ्यात पिवळा स्कार्प घालून कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दनाणून सोडला होता “आरक्षण आमच्या हक्का चे नाही कुणाच्या बापाचे” “जय अहिल्या जय मल्हार ” महापुरुषांच्या नावाने घोषणा दिल्या जातं होत्या यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वजनानी आपल्या कुटूंबासह उपोषणास पाठीबा द्यावा असे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले..

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उपोषण स्थळा पासून रॅलीला सुरुवात झाली महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक(एस. टी स्टॅन्ड ), चांदणी चौक, छ. शिवाजी महाराज चौक, भ. महावीर चौक, सिद्धनाथ मंदिर चौक मार्गे रॅली उपोषण स्थळी सांगता झाला.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून म्हसवड शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता बंद शांततेत पाळल्या मुळे उपोषण कर्त्याकडून नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे आभार मानले.