मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने रिपब्लिकन सेनेचे बेमुदत उपोषण मागे

228

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.1फेब्रुवारी):-म्हसवड नगरपरिषदेची मालकी असलेल्या दुकान गाळ्यांमध्ये (शॉपिंग सेंटर )लिलावात बोली बोलून गाळे घेतलेल्या मुळ मालकांनी पोट भाडेकरू ठेवले आहेत, त्यांच्याकडुन भरमसाठ बेकायदेशीर भाडे हे मालक घेत आहेत जे पालिका नियमानुसार पोटभडेकरू ठेवता येत नाही त्यावर पालिकेने निर्बंध आणण्यासाठी पालिकेने ते गाळे ताब्यात घेवु त्याचे फेर लिलाव करावेत या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील दत्तात्रय भोकरे या युवकाने तीन दिवसांपासुन पालिकेसमोर सुरु केलेल्या आमरण उपोषणाची अखेर मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी दखल घेत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व त्यांच्या मागणीनुसार 45 दिवसांत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकतें स्वप्नील भोकरे यांनी उपोषण मागे घेतले.

याबाबत पालिकेला दिलेल्या निवेदनात उपोषणकर्ते भोकरे यांनी म्हटले आहे की म्हसवड पालिकेने बांधलेल्या दुकान गाळ्यांमध्ये मुळ मालकांची दुकाने नाहीत त्याठिकाणी गाळ्यांची मोडतोड करून मालकांनी पोट भाडेकरू ठेवली

आहेत यातुन ते मोठ्या प्रमाणावर भाडे घेत आहेत,पालिकेने अशा गाळ्यांचे करार रद्द करून ते गाळे ताब्यात घेवुन त्याचे फेर लिलाव काढुन ते सुशीक्षीत बेरोजगारांना द्यावेत अशी मागणी केली आहे. सदरच्या मागणीवरून भोकरे यांनी गत 3 दिवसांपासुन पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले होते.

आज दि.31 रोजी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे याबाबत माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, व रणजीत सरतापे यांनी सविस्तर चर्चा करीत यशस्वी शिष्टाई केल्याने पालिकेच्या वतीने उपोषणकर्ते भोकरे यांना 45 दिवसांत कारवाई करण्याचे लेखी पत्र देण्यात आल्याने भोकरे यांनी मुख्याधिकारी डॉ. माने यांच्या हस्ते रस घेत उपोषण सोडले.