स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जांभूळघाट येथे अस्वच्छ बांधकाम!

421

 

 

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके
📱9890940507

चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन लाख रुपयाचा निधी खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले.
मे ते जून महिन्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून बांधकामाला सात महिने लोटून सुद्धा हे शौचालय जनतेचा उपयोगी पडले नाही, शौचालयाचे बांधकाम हे गावाबाहेर एका गड्ड्यात बांधण्यात आले असून शौचालयाच्या इमारतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा आहे, सध्या स्थितीमध्ये शौचालय कुलूप बंद असून,

येथे पाण्याची सोय सुद्धा नाही, आणि पावसाळा ऋतूमध्ये या इमारती भोवती पाणी साचणार हे मात्र नक्की, या इमारतीच्या बांधकावरून सरकारने दिलेला निधी फक्त खर्च करणे, त्याचा उपयोग जनतेच्या उपयोगासाठी नाही झाला तरी चालेल असे ग्रामपंचायतचे वर्तन दिसून येते.
शौचालय बांधकामालां निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, बांधकाम सुद्धा निष्कृष्ट आहे असा आरोप काही ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
तीन लाख रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेले शौचालय जनतेच्या उपयोगी कधी पडणार असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.