वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम मध्ये काश्यपी व वाहुल या बहीण भावाचा भव्य सत्कार

305

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 2 फेब्रुवारी):-येथील उज्वल नगर मध्ये राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांची मुलगी काश्यपी व मुलगा वाहुल उर्फ शुभ्रूराजे यांचा ते शिकत असलेल्या शाळे सत्कार करण्यात आला.

काश्यपी ही सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये तर वाहुल हा विश्वभारती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे.

सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये दोन दिवसीय २०२३-२४ वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम घेणार आले होते.

याच स्नेहमीलन कार्यक्रमात काश्यपीने भाग घेतला होता,तिने राजमाता जिजाऊ ची भूमिका साकारून शिवकालीन मर्दानी कला (अश्टे- डू – मर्दानी आखाडा) क्रीडा प्रकारातील लाठीकाठी, दुहेरी लाठी, दांडपट्टा, आगेची लाठीचे कला कौशल्य दाखवून उपस्थित मान्यवर पाहुण्याला व असंख्य विद्यार्थ्यांच्या पालक वर्गांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले, काश्यपीची कला पाहून उपस्थित पाहुणे मंडळींनी व पालक वर्गांनी सुजाण व्यक्तींनी तिला काही नगदी रक्कम बक्षीस सरूपात भेट म्हणून दिली, हिच्या या केलेल्या शिवकालीन कलेला सर्व शाळेत वाहवाई व कौतुक करण्यात आले,

ह्याच बरोबर या स्नेहमीलन कार्यक्रमात काश्यपीने २०२३-२४ यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या, जिल्हास्तरीय (अश्टे- डू – मर्दानी आखाडा) स्पर्धेत काश्यपी दोंदल हिने शिवकला (लाठीकाठी) या खेळ प्रकारात १४ वर्षा आतील ३५ किलो वजन आतील गटात प्रथम क्रमांक पटकावला, या बद्दल काश्यपी चे शाळेतर्फे मानचिन्ह, बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन भव्यदिव्य असा सत्कार करण्यात आला, हया प्रसंगी हॉकी असोसिएशनचे आखरे मॅडम, शाळेचे संथापक दिनेश पवार सर, उपमुख्याध्यापिका स्मिती देशमुख मॅम, वर्ग शिक्षिका निधी मॅम, क्रीडा शिक्षक प्रतीक खुजे सर, सतीश चव्हाण सर, रजत कडू सर, शाळेतील विद्यार्थी व वर्ग मैत्रीण व असंख्य पालक वर्ग व नागरिक उपस्थित होते.

त्याच बरोबर वाहुल पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विश्वभरती इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून वाहुल ने शाळे मध्ये शिवकालीन मर्दानी कलेचे प्रात्यक्षिक करून प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित केला, त्याच बरोबर जाजू इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये झालेल्या यवतमाळ गॉट टॅलेंट मध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावून प्रथम क्रमांकावर आपल्या नावाने शिक्कामोर्तब केले व प्रमाणपत्र व मानचिन्ह मिळवले या बद्दल विश्वभारती इंग्लिश मीडियम स्कूल कडून सत्कार घेण्यात आला, या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापिका सौ. मयुरी मॅम देशमुख, शाळेचे सचिव या सर्व मान्यवरांच्या हस्ते वाहुलचा यथोचित सत्कार करण्यात आला, हया प्रसंगी शाळेच्या वर्गशिक्षिका सौ.प्रिया पाटील, क्रीडा शिक्षक अमोल जयसिंगपूर व आकाश सर सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक वर्ग यांनी टाळ्यांचा कडकडाट करून वाहून च्या कलेची खूपच वाहवाई व कौतुक करण्यात आले.

काश्यपी व वाहुल याचे सर्व श्रेय आई कीर्ती दोंदल, वडील विनोद दोंदल, अथक प्ररिश्रम घेऊन कला शिकवणारे प्रशिक्षक प्रितम सर सोनवणे, मयुरेश्वर शर्मा सर्व गुरुजनांना व प्रशिक्षण वर्गातील सहकार्य करणाऱ्या सवंगडी सोहमसर बट्टलवार, आचलताई गुल्हाने, सृष्टीताई गीलोरकर, कार्तिक राऊत, गुरू चांदेकर,अमृताताई साळुंखे, सुकन्याताई, अनुश्रीताई, आस्थाताई, शिवराज, अथर्व, आकृती व गुप्ता परिवार इत्यादी सर्वाना दिले.