राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

478

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3फेब्रुवारी):- जिल्हा परिषद प्रशाला शिवाजीनगर तांडा यांच्यावतीने राजे उमाजी नायक स्मृतिदिन निमित्त 03-जाने रोजी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी मा.मुंजाजी कांबळे,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गंगाखेड कार्याध्यक्ष मा.प्रकाशजी शिंगाडे,ज्येष्ठ पत्रकार राहुल साबणे तर उमाजी नाईक स्मृतिदिना निमित्त संवाद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशालाचे मुख्याध्यापक शिवराज चव्हाण यांची उपस्थिती होती.

बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे याप्रसंगी म्हणाले,राजे उमाजी नाईक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाचे योगदान असून उमाजी नाईक यांची सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी.

त्यामुळेच विद्यार्थ्यांनी’ जास्तीत जास्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त करूत घ्यावे.उमाजी नाईक यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासाला पाठपुराव्याची जोड द्यावी.विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील अज्ञान दूर करत असताना का?कुठे?कधी?कसे?असे प्रश्न आपण शिक्षकांना/स्वतःला विचारले पाहिजे. आज परिस्थितीला संगणकाच्या युगात भूत विषयी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे जगात भूत नसते,त्यामुळे भूता विषयी असलेली भीती आपण दूर करत अंधश्रद्धा निर्मूलनाकडे वाटचाल केली पाहिजे असे सांगत उपस्थित विद्यार्थी व गुरुजनांना बार्टीच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

याप्रसंगी मा.प्रकाश शिंगाडे यांनीही चमत्कारावर मनोगत व्यक्त केले आपोआप कुठेही,कधीही चमत्कार होत नसतात.प्रत्येक घटनेचा कार्यकारण भाव लक्षात घेता कोणी तरी घडवून आणत असते यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा असे सांगितले.

उमाजी नाईक स्मृतिदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन/प्रास्ताविक शिक्षिका इंदुमती कदम यांनी केले तर आभार रिहाना आतार यांनी व्यक्त केले.उमाजी नाईक स्मृतिदिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शैला शिरसाट, उषा गडमे, इत्यादींनी परिश्रम घेतले.