अग्रणी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला

420

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.5फेब्रुवारी):-येथील अग्रणी सोशल फौंडेशनचा ८ वा वर्धापनदिन रवि.दि.४ फेब्रुवारी रोजी वेजेगाव ता.खानापूर उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे होते .यामध्ये संस्थापक आप्पासाहेब माने, मुख्य संचालिका शोभाताई लोंढे,शिल्पाताई गुरव, विद्याताई घाडगे, मंदाताई सोनताटे,रिटाताई माने,संघटक सागर माने,सविता गुरव आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुरूवातीला बैठकीच्या संयोजिका शिल्पाताईंनी सर्वांचे स्वागत केले.तर बाल संचालक रूद्रांश गुरव याने संविधान प्रास्ताविका वाचन केले तर आयुष कांबळे याने अग्रणी संस्थेचे गीत वाचन‌ केले.

यावेळी पुढील आर्थिक वर्षात कोणकोणत्या विषयावर काम करायचे याची चर्चा व नियोजन करण्यात आले.यावेळी सर्वांनी आपापली ओळख करून देऊन आपले मनोगत व्यक्त केले. मागील आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा घेण्यात येऊन पुढील काळात कोणत्या क्षेत्रात कार्य करावे,याचे नियोजन करून त्यावर चर्चा करण्यात आली.या बैठकीत मागील सन २०२२ वर्षात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या संघटक सागर माने या कार्यकर्त्यांस

“आदर्श अग्रणी स्वयंसेवक” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी विद्याताईंनी संविधान साक्षरता व व्यवसाय मार्गदर्शन याची जबाबदारी घेतली,तर मंदाताईंनी वाळवा तालुक्यात एकल महिलांचे संघटन उभारणीची जबाबदारी घेतली.शिल्पाताईंनी प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले,तर शोभाताईंनी संस्थेच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची जबाबदारी घेतली.तर रिटाताई माने यांनी आरोग्य साक्षरता व संविधान साक्षरता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आप्पासाहेब माने व सागर माने यांनी भटके विमुक्त जमातींच्या लोकांचे प्रबोधन करण्यासाठी व सभासद नोंदणी करण्याची जबाबदारी घेतली आहे. अग्रणी संस्थेच्या वतीने १ मार्च ते ८ मार्च हे प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करुन विविध स्पर्धा,प्रकल्प,उपक्रम व प्रबोधन  करावा असे आवाहन करण्यात आले.

यामध्ये कडेपूर,वडगाव(हवेली), कराड,ऐतवडे,निंबळक,लिंब,आळसंद,विटा,वेजेगाव,लेंगरे,नागेवाडी,सुलतानगादे,बेनापूर,खानापूर,मानेवाडी,गोमेवाडी,नेलकरंजी,खरसुंडी,घरनिकी या गावांमध्ये नियोजन करण्यात येणार आहे.

संस्थेचे वतीने भावी काळात सर्व फेलोशिपमध्ये योग्य व्यक्तीची निवड करुन त्यांना संधी देण्यात येणार आहे तसेच इकोनेट,कोरो व अॅक्शनएड या मदर एनजीओशी संपर्कात राहून जास्तीत जास्त प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय यावेळी करण्यात आला.शेवटी आभार प्रदर्शन बैठकीच्या संयोजिका शिल्पाताई गुरव यांनी मानले.