सातारा जिल्हा परिषद सी. ओ. श्रीमती यशीन नागराजन यांचे पत्रकारांनी केले स्वागत….

177

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.6फेब्रुवारी):-संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून महिला वर्गाला चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढून विज्ञानवादी बनवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा फुले व शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या कर्म व जन्मभूमीत श्रीमती यशीन नागराजन यांची निवड झाली आहे. सातारा जिल्हा परिषद सी. ओ .या पदावर पहिल्या महिला अधिकारी म्हणून इतिहासात नोंद झाली आहे. त्यांच्या आगमनाने महिला कर्मचारी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आज सातारा जिल्हा परिषदेच्या (मुख्य कार्यकारी अधिकारी) सी.ओ .दालन मध्ये ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप व धाडसी आणि निर्भीड पत्रकार विशाल कदम यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे मनापासून स्वागत केले. सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये महिला सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कर्तबगार महिलांनी राजकीय पक्षाने संधी दिली म्हणून ते पद भूषवले होते. पण शिक्षणाच्या जोरावर २०१९ साली आय. ए. एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन श्रीमती नागराजन यांनी विदेशी मंत्रालय सहाय्यक सचिव, यवतमाळ जिल्हाधिकारी अशा पदावर काम करून दलित, पद- दलित, आदिवासी व गरीब जनतेला शासकीय पातळीवर न्याय मिळावा. यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

आज औपचारिकता म्हणून त्यांच्या वतीने काही अधिकारी वर्गाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. परंतु, या पत्रकार परिषदेला देश व राज्य पातळीवरील वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना निमंत्रण नसल्यामुळे आदरणीय श्रीमती नागराजन यांच्या निवडीची बातमी सातारा जिल्हा पुरतीच मर्यादित राहिली असे स्पष्ट झाली आहे. सातारा जिल्ह्यात प्रथमच एक महिला पदाधिकारी जिल्हा परिषदेची सिओ झाल्याचा आनंद सर्वांना झाल आहे पण, मोजक्याच व ठराविक पत्रकारांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन नेमक्या काही गोष्टी साध्य झाल्या ? याची आता चर्चा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी मध्ये सुरू झालेले आहे.