काम तुमचं अन मरण आमचं…?

340

 

कार्यकारी संपादक//उपक्षम रामटेके
📱9890940507
जांभूळघाट-पिपंळगाव(नवतळा)रस्त्यावर छोट्या पुलाचे ( रपटा ) याचे काम चालू आहे, ही खूप आनंदाची आनंदाची गोष्ट आहे कारण त्यानंतर या रस्त्याचं बांधकाम चालू होणार, परंतु संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने हे कामे करत असताना या कामासाठी आवश्यक असणारा मटरेल( गिट्टी, चूर्री) जांभूळघाट- कोटगाव या रस्त्यावर टाकली. असून कोटगाव, हेटी, बोडदा, लोहारा येथील दळणवळण करणाऱ्या वाहनांना नाहक त्रास होत आहे गिट्टीने संपूर्ण रस्ता पॅक झाला असून क्वचितच जागा शिल्लक आहे, लाखो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराला कुठलीही जागा उपलब्ध होत नाही हे नवलच म्हणावे, गिट्टी रोडवर पसरली असल्यामुळे रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टदार घेणार काय..? हा अत्यंत गांभीर्य पूर्ण विषय आहे.काम तुमचं मरण आमचं असं होण्याआगोदर
संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने लवकरात लवकर या रोडवरून आपलं मटेरियल तिथून हलवावं जेणेकरून सामान्य जनतेला नाहक त्रास होणार नाही,कुठला अपघात होणार नाही.