जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रत्यक्ष दर्शन व मार्गदर्शन सोहळा 12 व 13 फेब्रुवारी रोजी!

215

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.7फेब्रुवारी):- जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज , जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ , नाणीजधाम यांचा प्रत्यक्ष मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक 12 व 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता ज.न.म.संस्थान , उपपीठ पूर्व विदर्भ , मोहगाव (झिल्पि) , ता हिंगणा , जि . नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

स्वामीजींचे मार्गदर्शन पूर्णतः विनामुल्य आपल्या भागातील दुःख पिडीतांना नाणीजधाम या ठिकाणी आर्थिक , शारीरीक किंवा वेळेअभावी जाता येत नाही . याकरीता स्वामीजी स्वतःच भेटीसाठी येत आहेत .

स्वामीजींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन व दर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.उपासक दिक्षा सोमवार दि 12 फेब्रुवारी 2024 ला व साधक दिक्षा दि 13 फेब्रुवारी 2024 ला दिल्या जातील.परिसरातील भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ज.न. म . संस्थान , उपपीठ पूर्व विदर्भ , पीठ प्रमुख राजेंद्रकुमार भोयर , व्यवस्थापक प्रविण परब व चंद्रपूर जिल्हा निरीक्षक राजेश येरने जिल्हाध्यक्ष लडी व चंद्रपूर जिल्हा भक्त सेवा मंडळ यांचे कडून करण्यात आले आहे .