रमाई म्हणजे मायेचे विश्व विद्यापीठ – किशोर भवरे

189

🔸माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि. ८ फेब्रुवारी):-शहरातील आंबेडकर चळवळीचे केंद्र मानले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त रमाईस अभिवादन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळी ०९ वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करून व त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भदंत कीर्ती बोधी आणि उषाताई संतोष इंगोले (अध्यक्षा रमामाता महिला मंडळ) यांच्या हस्ते करून लगेच ध्वज गीत व त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

तर रात्री ०७:३० वाजता “रमाईस अभिवादन” या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुधाकरराव लोमटे सर (सामाजिक कार्यकर्ते उमरखेड) यांनी माता रमाई बद्दल आपले मार्गदर्शन केले.

यावेळी मागील ३० वर्षापासून रमामाता महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा हिराबाई दिवेकर यांच्या सहकाऱ्यांनी जिवंत ठेवले आहे. यांच्याच परिश्रमामधून विहार बांधल्यामुळे त्यांचा सत्कार मान्यवरांच्या व आयोजकांच्या हस्ते करण्यात आला.

त्याच बरोबर वार्ड मधील ज्येष्ठ महिलांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सागर घुगरे (सामाजिक कार्यकर्ते) आणि किशोर भवरे होते.

भवरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, रमाई म्हणजे मायेचे विश्व विद्यापीठ आहे. नऊ कोटी लेकरांची माय झाली ती रमाई… लहानपणापासूनच रमाई संघर्षमय जीवन जागल्यात.बाबासाहेबांना घडविण्यासाठी रमाईने अथांग परिश्रम करून बाबासाहेबांना परदेशी शिक्षणासाठी पाठवले.त्यामुळेच बाबासाहेब घडले.
रमाईचा त्याग अस्मरणीय आहे तो कधीही विसरता येत नाही.

नवनिर्वाचित रमामाता महिला मंडळांनी रमाईचा आदर्श घेऊन त्यांच्या गुणांचा स्वीकार करावा…! असे भवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आणि सम्यक बुद्ध विहाराकरिता दोन साऊंड बॉक्स भेट देण्याचा शब्द दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते उमरखेड) यांनी केले होते.

यावेळी रमामाता महिला मंडळाच्या सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संतोष इंगोले, तुषार पाईकराव, राजू धबाले, राजू सावतकर, नितीन आठवले, उषाताई इंगोले, भारतीताई केंद्रेकर, दिपाली दिवेकर, उज्वला धबाले, बेबाबाई गवंदे, प्रज्ञा दिवेकर, स्वाती दिवेकर, ममता श्रवले, भारताबाई दिवेकर, मिराबाई दिवेकर इत्यादी अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले.