सत्यशोधक समाज संघाची ऑनलाईन बैठक उत्साहात संपन्न !..

160

🔸ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे १० मार्चला सत्यशोधक समाज महिला संघाचे अधिवेशन घेणार – वंदनाताई वनकर

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.8जानेवारी):- राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले निर्मित सत्यशोधक समाज स्थापनेला १५० पूर्ण झाले आहेत व भारतातील थोर समाजसेविका, देशातील प्रथम मुख्याध्यापिका व शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सत्यशोधक समाज संघाच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले महिला अधिवेशन १० मार्च रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे घेणार आहोत.

या ऑनलाईन गुगल मीट मिटींगचे प्रास्ताविक वंदनाताई वनकर यांनी केले. या मीटिंग ला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिला व सत्यशोधक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. १० मार्चला घेण्यात येणाऱ्या सत्यशोधक महिला संघाचे पहिले अधिवेशन संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली व नियोजन बैठक घेण्यात आली. या क्रांतिकारी भूमीत महाराष्ट्रातील पहिलं सत्यशोधक समाज संघाचे महिला अधिवेशन होणार आहे याची महाराष्ट्रातील सर्वच महिलांना मोठी उत्सुकता आहे.

या ऑनलाइन मिटींगला वंदनाताई वनकर (नागपूर ), माधुरी खैरनार ( मुंबई ) डॉ. कुंदा धुळे ( छ. संभाजी नगर ), संजीवनी जाधव (नाशिक ), संगीता महाजन ( भडगाव ), मीराताई मदनकर, प्रतीक्षा घोडके ( नागपूर ), रूपाली इंगोले (पुणे ), अर्चना तांबे, उषा मेहत्रे, सरस्वती हरकळ, अनिता देवतकर ( छ.संभाजीनगर ) ज्योत्स्ना पिंपरे (तळोदा ), रिम्पल जाधव (उल्हासनगर ), लता खाडे (मुंबई ),रोशन शिवणकर ( गोंदिया ), रिद्धी रोकडे ( चाळीसगाव ) वेणु प्रमोद पाटील ( धरणगांव ) निशा हटवार, प्रवीणा बालपांडे ( नागपूर ), पुष्पा पाटील ( जळगांव ), हेमांगी महाजन ( ४० गांव ) यासह असंख्य महिला सहकुटुंब उपस्थित होत्या.

या ऑनलाइन मिटींगला सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार ( छ.संभाजीनगर ) यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले, नियोजन सांगितले व या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. याप्रसंगी सचिव डॉ.सुरेश झाल्टे ( धुळे ), विधीकर्ते साळूबा पांडव ( छ. संभाजी नगर ), भगवान रोकडे ( ४०गांव ), राजकिशोर तायडे ( धुळे ), भीमराव कोथिंबीरे ( श्रीगोंदा ), आबासाहेब वाघ,एच.डी.माळी, गोरक देशमुख, लक्ष्मणराव पाटील,पी.डी.पाटील ( जळगांव ) , नरेंद्र जाधव (नंदुरबार ), डॉ.दत्ताजीराव जाधव, कनिफ भोसले ( सातारा ), कैलास महाजन ( रायगड ), रामचंद्र भागवत ( दौंड ), दिग्विजय वाळवेकर ( सांगली ),संजय लाडे (चंद्रपूर ),डॉ देविदास शेंडे ( तळोदा ), कैलास जाधव ( पातोंडा ),डॉ. कौस्तुभ विलास ( पुणे ), सुभाष जाधव ( गेवराई ), रघुनाथ ढोक ( पुणे ), सुभाष गांगुर्डे ( छ.संभाजीनगर), संदीप मुके (यवतमाळ ), रमेश वराडे (जामनेर ), प्रा. गुलाबराव मंडलिक ( आष्टी ), यासह महाराष्ट्रातील अनेक सत्यशोधक कार्यकर्ते सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऑनलाइन मिटींगचे सूत्रसंचलन वंदना सुरजुसे तर आभार संजीवनी जाधव यांनी मानले.