स्व.अमोल भैय्या गलधर यांच्या जयंतीनिमित्त लिंबागणेश येथे रक्तदान शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप – डॉ.गणेश ढवळे

51

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.8फेब्रुवारी):-तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथे आज दि.८ फेब्रुवारी गुरुवार रोजी स्व.अमोल भैय्या गलधर यांच्या जयंतीनिमित्त स्व.अमोल भैय्या गलधर युवा मंच लिंबागणेश यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्व.अमोल भैय्या गलधर यांना प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे टेक्निशियन बिभीषण म्हात्रे,ब्रदर संतोष गायकवाड, सहाय्यक सतिश गायकवाड रक्तपेढी टीम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेशचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल देशमुख, डॉ.गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात,राम फाळके, विकास बारगजे,चिंतामण ढास, शंकर वाणी, बाळासाहेब मुळे, संतोष भोसले, शेख खाजु उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी स्व.अमोल भैय्या युवा गलधर मंच लिंबागणेशचे औदुंबर नाईकवाडे , सय्यद अख्तर,बाळु कदम, सचिन आगवान,पप्पु आवसरे, महावीर वाणी, सिद्धार्थ निर्मळ,करण वायभट, ओंकार पवार,जय थोरात, वैभव आवसरे, सिद्धार्थ निर्मळ,अजय शेळके,दादा शेळके यांनी परीश्रम घेतले.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

स्व.अमोल भैय्या गलधर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबागणेश याठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक आबासाहेब हांगे, सहशिक्षक अमर पुरी,संदिपान आगम,चौरे,श्रीमती कुलकर्णी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वाणी व ग्रामस्थ उपस्थित होते.