क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओचा उद्घाटन मोठ्या उत्सहात संपन्न

41

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.8फेब्रुवारी):-नवोदित कलाकारांना घेऊन नाटक व चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लबच्या पुढाकारातून तयार झालेल्या क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओचा शानदार उद्घाटन समारंभ मोठ्या उत्सहात संपन्न झाला. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध सामाजिक, राजकीय व सिने क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली. दर्जेदार लघुपट, माहितीपट आणि चित्रपट निर्मिती करण्यास या स्टुडिओची मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओचा उपयोग परिवर्तनाची चळवळ गतिशील करण्यासाठी होणार असून या स्टुडिओच्या माध्यमातून लहान मुलांचे प्रबोधन करण्यासाठी विविध विषयावरील लघुपट तयार केले जाणार असल्याचे मत स्टुडिओच्या संचालिका डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी यांनी सांगितले.

यावेळी भन्ते एस. संबोधी, प्रा. किसनराव कुराडे, प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, अनिल म्हमाने, प्रा. शहाजी कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, सुरेश केसरकर, डॉ. एन. एस. जाधव, संजय अर्दाळकर, डॉ. श्रीपाद देसाई, ॲड. करुणा विमल, हिंदुराव हुजरे-पाटील, डॉ. प्रविण कोडोलीकर, ॲड. अकबर मकानदार, ॲड. अतुल जाधव, रूपाताई वायदंडे, वसंतराव भोसले, डॉ. गिरीश मोरे, उषा पाटील व्यवस्थापकीय प्रमुख पुजा जाधव, नामदेव मोरे, अश्वजीत तरटे यांच्यासह विविध क्षेत्रातील डॉ. अमर कांबळे, कृष्णाजी हरगुडे, ताज मुल्लाणी, ॲड. शितल देसाई, प्रविण मस्के, प्रा. टी. के. सरगर, अमित शहा, संग्राम पाटील, विनायक माजगावकर, संग्राम तोडकर, डॉ. स्वप्निल बुचडे, भीमराव पाटू, किशोर भोसले, अनिता काळे, डॉ. अमोल महापुरे, डॉ. पल्लवी कोडक, डॉ. सयाजी गायकवाड, प्रा. स्नेहल भोसले, डॉ. सारिका मोरे, डॉ. ऋतुराज कुलदीप, डॉ. सुरेखा मंडे, प्रा. प्रियांका साळुंखे, डॉ. सी. के. पाटील, प्रा. अस्मिता इनामदार, डॉ. सारिखा कांबळे, महादेव चक्के, संजय ससाणे, मोहन मिणचेकर, डॉ. अविनाश वर्धन, मिलिंद गोंधळी, प्रशांत आवळे, किशोर खोबरे आदी मान्यवरांसह सामाजिक कार्यकर्ते, कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.