पत्रकारिता क्षेत्रातील एक रत्न हरपले‌.!

197

🔸दैनिक चालू वार्ता चे पत्रकार कृष्णा जाधव यांचे निधन

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.9फेब्रुवारी):-उमापुर आणि उमापूर पंचक्रोशीतील अतिशय निडर आणि निर्भीड पत्रकार कृष्णा जाधव यांच्या अकाली जाण्याने उमापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, धार्मिक, अवैध धंदे तथा उमापूरच्या विविध प्रश्नांवर व मागील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर उमापूर परिसरातील मराठा मोर्चा विषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून दैनिक चालूवार्ता न्युज पेपर व लाईव्ह चैनल वर गेल्या काही दिवसांपासून अतिशय अभ्यासपूर्ण लेखन, चित्रण करून समाजाचे शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडणारे कृष्णा जाधव हे आज या भुतालावर नाहीत यावर विश्वास बसत नाही.

खरंतर पुत्र व्हावा ऐसा गुंडा।तिन्ही जगी लावावा झेंडा। या उक्तीप्रमाणे एका बंजारा समाजात सामान्य शेतकऱ्याच्या ऊसतोड कामगाराच्या पोटी जन्म घेऊन, अल्पशिक्षण असतानाही आपली ओळख सामाजिक, राजकीय, धार्मिक प्रशासकीय अनेक क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या विद्रोही विचाराची एक वेगळी ओळख निर्माण करणे ही साधी गोष्ट नाही. आपल्या पोटापाण्यासाठी कुटुंबासाठी शेवगाव गेवराई रोडवर रात्र-रात्र चहा पाणी बॉटल गायछाप भेळ विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता करता सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणारा असा हा उमदा मित्र परमेश्वराने एवढ्या लवकर न्यायला नको होता. कसेही राहिले असतोल पण सामाजिक जीवनामध्ये कृष्णा कायम तुझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

खरंतर आमच्यापेक्षा तुझ्या मुलं बाळा बायका पोरांना वडिलांना कुटुंबातल्या सदस्यांना काय वेदना असतील ते परमेश्वर जाणे.कृष्णा सलाम तुझ्या अल्पआयुष्याच्या कारकिर्दीला आणि लेखणीला जाधव परिवाराच्या दुःखात पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क टिम सहभागी आहे.