गावंडे महाविद्यालयात एड्स जनजागृती पथनाट्य सादर…

87

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)

उमरखेड(दि11फेब्रुवारी):-येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालत राष्ट्रीय सेवा योजना व आर आर सी क्लब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्याद्वारे एड्स नियंत्रण अभियाना द्वारे एड्स निर्मूलन उपचार व निदान यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले.

या नाटकासाठी श्रीकृष्ण बहुउद्देशीय विकास मंडळ संस्था, खडकदरी ता.पुसद जि. यवतमाळ कलापथक यांनी पथनाट्याद्वारे गावंडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना एड्स आजार प्रतिबंध, उपचार व नियत्रंण यावर नाटिका सादर केली व या माध्यमातून जनजागृती घडवून आणली.

त्यांनी पथनाट्याद्वारे माहिती दिली की, एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनोडिफेशिअन्सी वायरस, ज्यामुळे एड्स अर्थात् अक्वायर्ड इम्युनोडिफेशिअन्सी सिंड्रोम होतो. हा विषाणू सामान्यपणें, लैंगिक संबंधांतून शरिरातील द्रव्यांच्या आदानप्रदानाने, संक्रमित सूईद्वारे रक्तामार्फत किंवा एखाद्या संक्रमित गरोदर आईकडून बाळामध्ये पसरतो. विषाणू प्रतिरोधप्रणालीला बाधित करून शरिराच्या सुरक्षाव्यवस्थेलाच तोडून टाकतो आणि संक्रमित व्यक्तीला इतर संक्रमण आणि रोगांचा धोका वाढतो. सुरक्षित यौन आचरण, साफ सफाईचे ध्यान राखणे, सुरक्षित रक्तदान, निरोगी जीवनशैलीसाठी जरुरी आहे.

कार्यक्रमाचे नियोजन आय.सी.टी.सी. कौन्सिलर वैशाली के धोंगडे व प्रयोगशाळा तंत्रज्ञान श्री अमित जाधव उमरखेड, माधव कल्याणकर यांनी केले व आयोजन गावंडे महाविद्यालयामार्फत करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम , प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डी.व्ही. तायडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने प्रा. ए.पी. मिटके, प्रा. डॉ. बी. एम. सावरकर उपस्थित होते. कार्यक्रमात रा. से. यो. चे व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रदर्शन नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.