व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्यपदी श्रीहरी सातपुते यांची निवड..

52

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.12फेब्रुवारी):-पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या चंद्रपूर जिल्हा शैक्षनींक मदत कक्षाच्या सदस्यपदी श्रीहरी सातपुते यांची चिमूर व सिंदेवाही तालुक्याकरिता निवड करण्यात आली आहे

राज्यभरात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक अडचणी येऊ नये म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेने देशभरात शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे राज्यप्रमुख तथा व्हॉईस ऑफ मीडिया राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांचे सुचणेनुसार व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तालुका निहाय शैक्षनिक विभागाचे काम करण्यासाठी पंधरा तालुक्याकरीता प्रत्येकी दोन या प्रमाणे सात जणांची नियुक्ती करण्यात आली.

यामध्ये चिमूर – शिंदेवाही करीता श्रीहरी सातपुते यांचे सोबत चंद्रपूर – बल्लारपुर करीता शंकर महाकाली. राजुरा – कोरपना – जिवती करीता दीपक शर्मा. वरोरा – भद्रावती करीता चेतन लूतडे. मुल – सावली करीता रमेश माहुंरपवार. नागभीड – ब्रम्हपुरी करीता गोवर्धन दोनाडकर. व गोंडपिपरी – पोंभूर्णा करीता बाळू निमगडे यांची तालुका निहाय पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे